टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Gold Price Today : नव्या आठवड्यातही सोन्याची गुड न्यूज, सोनं आजही स्वस्त

Gold Price Today 08 June 2026 Latest News Updates in Marathi : अमेरिका-इराण शस्त्रसंधी कराराबाबतची अनिश्चितता ही सोन्यातील नव्या गुंतवणुकीला थांबवण्यामागील एक प्रमुख घटक आहे. देशांतर्गत बाजारातील सोने आणि चांदीच्या किमतींवर देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांचा प्रभाव पडतो. मात्र आज देशात सोन्याचे भाव..

Gold Price Today : नव्या आठवड्यातही सोन्याची गुड न्यूज, सोनं आजही स्वस्त, 10 ग्रॅमसाठी आता भाव फक्त...

गेल्या अनेक दिवसांपासून देशांतर्गत सोनं-चांदीचे भावघसरतानाच दिसत असून , नव्या आठवड्याच्या पहिल्या सोमवारीही हाच ट्रेंड कायम आहे. सोमवार, 8 जूनच्या सकाळी देशातील बहुतांश शहरात सोनं आणखीनच स्वस्त झालं. राजधानी दिल्लीत 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोन्याची किंमत घसरून आता 1 लाख 55हजार 900 रुपये झाली आहे. गेल्या एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याची किंमत 4690 रुपयांपर्यंत घसरली. तर 22 कॅरेट सोनं हे 4300ल रुपयांनी स्वस्त झालंय. अमेरिका-इराण शस्त्रसंधी कराराबाबत असलेली अनिश्चितता यामुळे सोन्यातील नव्या गुंतवणुकीला विराम मिळाला आहे, ते एक प्रमुख कारण आहे. सोन्याचे कमी झालेले दर हे ग्राहकांसाठी दिलासादायक आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस 4,470.79 डॉलर्स इतका आहे.

देशातील काही शहरांतील सोन्याचे भाव

राजाधानी दिल्लीत 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा सोन्याचे दर हे 1,55,900 तर 22 कॅरेटटा भाव 1,40,140 रुपये इतका आहे. मुंबई आणि कोलकाता येथे 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,39,990 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याीच किंमत 1,52,720 रुपये इतकी आहे.

चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा रेट 1,54,900 आणि 22 कॅरेटचा भाव 1,41,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुणे आणि बंगळुरूत 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं हे 1,52,720 रुपयांना तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोनं हे 1,39,990 रुपयांना आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹)
दिल्ली 140140 155900
मुंबई 139990 152720
अहमदाबाद 140040 155800
चेन्नई 141990 154900
कोलकाता 139990 152720
हैदराबाद 139990 152720
जयपुर 140140 155900
भोपाळ 140040 155800
लखनऊ 140140 155900
चंदीगड 140140 155900

चांदीचे दर

ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही सातत्याने घट होत आहे. 8 जूनच्या सकाळी चांदीचा भाव प्रति किलोग्राम 2 लाख 64 हजार 900 रुपये इतका होता. गेल्या आठवड्यात चांदीच्या भावात 15 हजार रुपयांची घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्पॉट चांदीचा भाव प्रति औंस 72.79 डॉलर्स इतका आहे. देशांतर्गत बाजारातील सोने आणि चांदीच्या किमतींवर देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांचा प्रभाव पडतो.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा