टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम

Rajya Sabha Election 2026 NCP: राज्यसभेसाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना पक्षानं राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळाली आहे.

राजेंद्र जैन यांची राज्यसभेसाठी निवड झाल्यानंतर राजकीय वर्तुळात सुनील तटकरे आणि प्रफुल पटकरे या जोडगोळीच्या अजूनही कायम असलेल्या वर्चस्वाची चर्चा रंगली आहे. यंदाच्या विधानपरिषद निवडणुकीत रायगडमध्ये भाजप आणि शिंदे गटात प्रचंड रस्सीखेच असतानाही सुनील तटकरे यांनी आपले सर्वपक्षीय संबंध आणि राजकीय अनुभव वापरुन त्यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळवून दिली. एवढेच नव्हे तर अनिकेत तटकरे यांची रायगड विधानपरिषदेतून बिनविरोध निवडही झाली. हे अर्थातच सुनील तटकरे यांचे यश मानले जात आहे. त्यापाठोपाठ रविवारी छगन भुजबळ यांच्यासारखा तगडा नेता रिंगणात असताना अनपेक्षितपणे शेवटच्या क्षणी प्रफुल पटेल यांचे कट्टर समर्थक राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळाली आहे. यानिमित्ताने राजकीय वर्तुळात तटकरे-पटेल यांच्या या यशाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

अवघ्या काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची यादी पाठवली होती. या यादीत सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या नावापुढे पदाचा उल्लेख नसल्याने एकच गहजब झाला होता. तटकरे-पटेलांची पदावरुन उचलबांगडी करण्यात आल्याची आणि सुनेत्रा पवार या दोघांवर प्रचंड नाराज असल्याचे वृत्त तेव्हा पसरले होते. यानंतर काही दिवस सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साईडलाईन करण्यात आल्याचेही सांगितले जात होते. पार्थ पवार आणि तटकरे-पटेल यांच्या प्रचंड अंतर्गत धुसफूस असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील तटकरे आणि पटेलांचे स्थान डळमळीत झाल्याची भीती व्यक्त करत अनेकांनी त्यांच्या भावी राजकीय कारकीर्दीबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र, त्याच सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी अवघ्या महिनाभरातच अनुक्रमे अनिकेत तटकरे आणि राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळवून देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही आपला वरचष्मा कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर प्रहार

Maharashtra Rain Konkan: पहिल्याचं पावसात घटप्रभा नदीचं रौद्ररुप; सावंतवाडीमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, PHOTO

मान्सून लांबला… १५ जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी, हवामान खात्याची मोठी माहिती

Sunil Tatkare: रोहित पवारांना कोण विचारतंय? सुनिल तटकरेंनी भाजप प्रवेशाची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारी..

Sharad Pawar:… तर सत्ताधाऱ्यांना किंमत मोजावी लागेल…गॅस दरवाढीचा भडका… शरद पवारांचा थेट इशारा

PM Kisan Yojana: गुडन्यूज! पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच खात्यात, लक्षात ठेवा ही तारीख… पीएम मोदींच्या हस्ते होणार वितरण