टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

ज्याची भीती तेच घडले, युद्धाला पुन्हा सुरूवात, इराणचा इस्त्रायलवर मोठा हल्ला, तब्बल..

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव अधिक वाढला आहे. पुन्हा एकदा मोठा हल्ला करण्यात आला. इराणकडून इस्त्रायलवर हल्ला करण्यात आला. या हल्ला नक्की का करण्यात आला, याचेही थेट कारण इराणकडून सांगण्यात आले. मात्र, यामुळे जगात मोठा हाहाकार उडाला.

ज्याची भीती तेच घडले, युद्धाला पुन्हा सुरूवात, इराणचा इस्त्रायलवर मोठा हल्ला, तब्बल..

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबावे, ही जगाची इच्छा आहे. मात्र, युद्ध थांबायचे सोडून अधिक भडकताना दिसत आहे. त्यामध्येच इस्त्रायलवर थेट मोठ्या मिसाईलने इराणने हल्ला केला युद्धविराम लागू झाल्यानंतर इराणचा हा पहिल्याच हल्ला आहे. इराणने इस्त्रायलवर केलेल्या या हल्ल्यानंतर स्थिती अधिक बिकड होत आहे. मध्य पूर्वेत तणाव अधिक वाढला. रात्री उशिरा इस्त्रायलवर दोन्ही बाजूने हल्ला झाला. इराणने एका बाजूने मिसाईल हल्ला केला तर दुसऱ्या बाजूला लेबनानकडून हिजबुल्लाह यांनीही मिसाईल हल्ला इस्त्रायलवर केला. त्यानंतर इस्त्रायलचे डिफेंन्स सिस्टम अॅक्टिव्ह झाले. वेगवेगळ्या शहरांमध्ये सायरन वाजले. सायरन वाजताच लोक सुरक्षित स्थळी गेले. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने इस्त्रायलवर 4 बॅलिस्टिक मिसाईल टाकले. इस्त्रायलने यादरम्यान म्हटले की, एप्रिलमध्ये झालेल्या युद्धानंतर पहिल्यांदा इराणने त्यांच्यावर हल्ला केला.

इराणने हा हल्ला इस्त्रायलवर लेबनानमुळे केला. इराणचे स्पष्ट म्हणणे आहे की, इस्त्रायलने लेबनानवरील सैन्य कारवाई थांबवली पाहिजे. मात्र, इस्त्रायल हिजबुल्लाहच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर हल्ला करत आहे. लेबनानची राजधानी बेरूतवर नुकताच मोठा हल्ला करण्यात आला. यादरम्यानच इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची यांनी इराण आणि लेबनान या दोन्ही देशांचे एकत्र ध्वजाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

या हल्ल्यादरम्यान इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांचे सहकारी मोहसेन रेजाई यांनी मोठे विधान केले. त्यांनी म्हटले की, इराणने वारंवार इशारा देऊनही युद्धविरामाचे उल्लंघन केले जात होते. लेबनानवरील हल्ला कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन करणार नाहीत. या हल्ल्यांना आज रात्री आम्ही उत्तर दिले. इराणने दिलेल्या इशाऱ्यानंतर बेरूतच्या भागात इस्त्रायलने मोठे हल्ले केले.

त्यानंतर इराणने मोठी कारवाई इस्त्रायल विरोधात केली. इराणच्या या घातक हल्ल्यानंतर इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या अध्यक्षांना फोन केल्याची माहिती मिळत आहे.आता तणाव वाढला आहे. इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या युद्धात होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने स्थिती अधिक भयंकर होत आहे. ऊर्जेचे मोठे संकट आज संपूर्ण जगावर आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now