निदर्शने, मोर्चे आणि आंदोलनांनी काय साध्य होतं? यातून हेच सिद्ध होतं की आपण जिवंत आहोत! सरकारसाठी आपण कदाचित किडे असू, पण आपण जिवंत आहोत आणि आपल्या हक्कांसाठी लढण्यास सक्षम आहोत, असे अभिजित म्हणाला.

Cockroach Janata Party
1/10
नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतरवर पाच तासांचे आंदोलन केले.
2/10
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पाच दिवसांत राजीनामा द्यावा, अन्यथा पुढच्या शनिवारी पुन्हा जंतर मंतरवर आंदोलन करण्याचा इशारा दिला.
3/10

अभिजीत यांच्यासोबत आंदोलनात हजारो आंदोलक सामील झाले, ज्यात प्रामुख्याने विद्यार्थी आणि तरुण होते. काही वृद्ध व्यक्ती आणि पालकही आपल्या मुलांसोबत आले होते.
4/10

अभिजीत शनिवारी सकाळी अमेरिकेतून दिल्लीला परतले होते. ते विमानतळावरून थेट जंतर मंतरला गेले.
5/10

कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतरवर सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात केली.
6/10

हे आंदोलन सुमारे पाच तास चालले. दुपारी 3 वाजता अभिजीत आणि सोनम वांगचुक निघून गेले.
7/10

आंदोलनादरम्यान पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. आंदोलनाच्या समर्थकांमध्ये आणि विरोधकांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
8/10

पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या घरी महाराष्ट्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
9/10

सकाळपासून घराबाहेर बॅरिकेड्स लावण्यात आले असून, पोलिसांची वाहनेही बाहेर उपस्थित होती.
10/10

मात्र, दीपके यांचे आईवडील घरी आहेत की नाही, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. यापूर्वी, दीपके यांच्या आईवडिलांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला होता.












