Abhijit Dipke : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे अमेरिकेतून दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Delhi Airport) उतरले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती.

1/14
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijit Dipke) हे अमेरिकेतून भारतात दाखल झाले असून, त्यांच्या आगमनासोबतच संघटनेला हे पहिले मोठे यश मिळाले आहे.
2/14
ऑनलाईन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड सक्रिय असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (Cockroach Janta Party) जंतरमंतरवरील प्रस्तावित आंदोलनाला (Protest) अखेर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) अधिकृत परवानगी दिली आहे.
3/14

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे अमेरिकेतून दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Delhi Airport) उतरले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती.
4/14

विमानतळावरून बाहेर येताना अभिजीत दीपके यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (Dr. Babasaheb Ambedkar) पुस्तक होते. विमानतळ परिसरातून दिल्ली पोलिसांच्या कड्या सुरक्षेत ते एका खाजगी वाहनाने रवाना झाले.
5/14

आंदोलनाची परवानगी मिळाल्यानंतर अभिजीत दीपके यांनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे.
6/14

अभिजीत दीपके कॉकरोच जनता पार्टीमुळे देशभरात प्रसिद्ध झाले. त्यांच्या ऑनलाईन चळवळीला मोठा प्रतिसाद मिळाला. डिजिटल फॉलोअर्समध्ये या नवख्या चळवळीने काँग्रेससह भाजपला मागे टाकले. तर छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसी परिसरातील त्यांच्या घरी शुकशुकाट आहे.
7/14

त्यांचे कुटुंबिय अज्ञात स्थळी गेले आहे. त्यांच्या घरी आता कोणी नाही. तर सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
8/14

अभिजीत यांचे वडील भगवानराव दीपके हे गेल्या वर्षी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातून(MIDC) अभियंता पदावरून निवृत्त झाले आहेत.
9/14

मुलाने सुरू केलेल्या या चळवळीने ते चिंतेत आहेत. “एक वडील म्हणून मला चिंता वाटणे स्वाभाविक आहे. सुरुवातीला अशा प्रकारची चळवळ, अभियान सुरू करण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्यास मी त्याला सांगितले होते.
10/14

त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण एखाद्या व्यक्तीने जर काही निश्चय केला तर त्याला काही समजून सांगणे कठीण होते. पण मला खात्री आहे की, तो कायद्याचे कुठलेही उल्लंघन करणार नाही.”
11/14

अभिजीत दीपके यांच्या वडिलांनी सांगितले की, त्यांना, कुटुंबियांना कुणीही धमकी दिलेली नाही. पण आई-वडील म्हणून चिंता वाटणे स्वाभाविक आहे.
12/14

अभिजीत याला कायद्याची चांगली समज आहे. तो कायद्याचे कोणतेही उल्लंघन करणार नाही. तर अभिजीत याला अटकेची कल्पना आहे, त्याने त्यासाठी तयारी केली आहे.
13/14

तर मदतीसाठी त्याने आपल्याला फोन केल्याची माहिती मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे यांनी दिली आहे.
14/14

अभिजीत दीपकेंच्या घराच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.














