टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

प्रतिक्षा संपली, अखेर मॉन्सून केरळमध्ये दाखल, पावसाचा मोठा इशारा..

अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर तीन दिवसांनी उशिरा मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला. मॉन्सून दाखल होताच राज्यातही आज पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. मात्र, हा मॉन्सूनचा पाऊस नसणार आहे तर हा अवकाळीच पाऊस आहे. याबाबत हवामान तज्ज्ञांनी मोठी माहिती दिलीये.

प्रतिक्षा संपली, अखेर मॉन्सून केरळमध्ये दाखल, पावसाचा मोठा इशारा..

सर्वांकरिता आनंदाची बातमी आहे. अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला. केरळमध्ये मॉन्सून 3 दिवस उशिराने दाखल झाला. याबाबत बोलताना प्रवीण कुमार वैज्ञानिक हवामान विभाग यांनी म्हटले की, मॉन्सून केरळमध्ये आलाय. दक्षिण महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसात मान्सून दाखल होईल. विदर्भात 15 जून नंतरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पुढचे 2 ते 3 दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील जिल्ह्यात ढगाळ वातावरण असलं तरी सध्या असच तापमान कायम असेल, 40 ते 42 डिग्री पर्यंत उन्हाचा पारा असेल. विदर्भात पुढील काही दिवस वादळीवाऱ्याचा मध्यमस्वरूपाचा पाऊस होईल. मात्र, आता येणारा पाऊस हा अवकाळीच असेल कारण मान्सूनच्या अनुषंगाने अजून विदर्भात अनुकुल वातावरण निर्माण व्हायचे आहे.

विदर्भासह राज्यात 15 जूनच्या आसपास मॉन्सून दाखल होईल. वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्यम स्वरूपाच पाऊस आणि वादळी वारा असणार आहे. पण अवकाळी पाऊस असेल, हा मान्सून पूर्व पाऊस नसेल. विदर्भाला मान्सूनसाठी अजून प्रतिक्षा कायम असणार आहे… मात्र 10 जून नंतर परिस्थितीच्या अनुषंगाने याचा अंदाज घेता येईल.

विदर्भातील काही जिल्ह्यांत येत्या 24 तासात काही ठिकाणी वादळासह तुरळक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशपासून विदर्भ होत रायलसीमापर्यंत उंचावर सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि झंजावत तयार झाला आहे. याच्या प्रभावाने येत्या 24 तासात विदर्भातील काही जिल्ह्यात विजा आणि वादळासह तुरळक स्वरूपात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

या काळात तापमानात चढ-उतार होणार असून उकाड्याचा त्रास कायम राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी विदर्भाच्या बहुतेक शहरात तापमान वाढ नोंदविण्यात आली असून ब्रह्मपुरीत राज्यात सर्वाधिक 44 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया आणि वर्धा येथे 1 ते 2 अंशाची वाढ होऊन तापमान 41 ते 42 अंशावर गेले.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now