टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Shirdi Accident : बस अन् अर्टिगाचा भीषण अपघात, कारचा अक्षरश: चक्काचूर, दोन सख्ख्या भावांचा करुण अंत; लेकरांना बघून माऊलीचा मन हेलावणारा टाहो

On: June 1, 2026 12:55 PM
Follow Us:

Shirdi Nashik Highway Accident : शिर्डी-नाशिक महामार्गावर काल रविवार एक भीषण अपघात झाला. या अपघातात दोन सख्ख्या भावांचा करुण अंत झाला आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  • बस अन् अर्टिगाचा अपघात

    मोबीन खान, शिर्डी-नाशिक महामार्गावरील सावळीविहीर हद्दीत राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस आणि अर्टिगा कार यांच्यात काल रविवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला.

  • दोन्ही सख्ख्या भावांचा मृत्यू

    दोन्ही सख्ख्या भावांचा मृत्यू

    या भीषण अपघातात कारमधील दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात मृत हे दोन्ही सख्ख्ये भाऊ असल्याचं समोर आलं आहे.

  • कारचा अक्षरशः चक्काचूर

    कारचा अक्षरशः चक्काचूर

    मिळालेल्या माहितीनुसार, काल रविवारी पनवेलहून शिर्डीकडे येणारी एसटी बस आणि नाशिकच्या दिशेने जात असलेली अर्टिगा कार यांच्यात जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर एसटी बसचं मोठं नुकसान झालं आहे.

  • सुपर स्पेशालिटी रुग्णालयात

    सुपर स्पेशालिटी रुग्णालयात

    दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं आणि जखमींना तातडीने शिर्डी येथील साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

  • जखमींची नावं

    जखमींची नावं

    गबला ललिता, नागम्मा, पुष्पक लक्ष्मी, प्रेमला आणि कविता (सर्व राहणार आदिलाबाद). श्रद्धा सुरेंद्र काटे (नाशिक), सुमंत वाल्मीक (मोकल), कोकमठान (कोपरगाव), प्रियंका रविंद्र ससाने, सोहन रविंद्र ससाने, प्रांजल रविंद्र ससाने (तिघं राहणार श्रीरामपुर).

  • अपघाताचं नेमकं कारण अस्पष्ट

    अपघाताचं नेमकं कारण अस्पष्ट

    अपघात होताच मृत व्यक्तींची ओळख पटविण्याचं काम सुरू होतं. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे वाहन चालकांना याचा अंदाज आला नसल्याची स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस अधिक तपास करत आहेत.

  • अपघातानं सर्वत्र हळहळ

    अपघातानं सर्वत्र हळहळ

    या अपघातात हे 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर शिर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशाल काशीनाथ कांबळे (वय 43) आणि महेश काशिनाथ कांबळे (वय 40) या दोन्ही सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now