टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

काँग्रेस आणि पवार गटाचे उमेदवारही ठरले, कुणाला लागली लॉटरी; टफ फाईट होणार; सोलापूर – आदित्य फत्तेपूरकर यांना उमेदवारी जाहीर

On: June 1, 2026 12:23 PM
Follow Us:

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या काही उमेदवारांनी अर्जही भरला आहे. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर होत आहेत.

काँग्रेस आणि पवार गटाचे उमेदवारही ठरले, कुणाला लागली लॉटरी; टफ फाईट होणार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. महायुतीने आपले उमेदवार जाहीर केले आहे. महायुतीच्या काही उमेदवारांनी अर्जही भरला आहे. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर होत आहेत. काँग्रेस आणि शरद पवार गटाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी टफ फाईट होण्याची शक्यता आहेय. या 17 जागांच्या लढाईत कुणाचा विजय होतो आणि कुणाचा पराजय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसनेही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. एकूण पाच नावे जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूर-वर्धा, अमरावती, यवतमाळ, लातूर आणि सोलापूर येथील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर अहमदनगर, नागपूर आणि भंडाऱ्यातील उमेदवारांची नावे थोड्याच वेळात फायनल होणार आहेत. त्यामुळे या तीन ठिकाणी काँग्रेस कुणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेसचे उमेदवार

चंद्रपूर वर्धा – शैलेश देशमुख

अमरावती – हर्षदीप देशमुख

यवतमाळ – साहेबराव कांबळे

लातूर – महेश देशमुख

सोलापूर – आदित्य फत्तेपूरकर

पवार गटाचे एकाच जागेसाठी दोन अर्ज

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीनेही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. सातारा-सांगली मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दोन उमेदवार थोड्याच वेळात अर्ज भरणार आहेत. अभय जगताप आणि बाळासाहेब पाटील हे दोन उमेदवार अर्ज भरणार आहेत. अभय जगताप यांच्या खांद्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून ते सध्या रूग्णालयात आहेत.त्यामुळे निवडणूक लढायची की नाही याबाबत त्यांच्या मनात संभ्रम आहे. सध्या अर्ज भरून नंतर उमेदवारी मागे घेतली जाऊ शकते. त्यामुळे सातारा सांगलीतील दोन उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अर्ज भरणार आहेत.

भाजपची यादी

अहिल्यानगर- प्राजक्त तनपुरे

छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट

नांदेड – अमर राजूरकर

धाराशिव बीड लातूर- बसवराज पाटील

जळगाव- नंदकिशोर महाजन

नागपूर- राजीव पोतदार

वर्धा चंद्रपूर गडचिरोली- अरुण लखाणी

भंडारा-गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर

अमरावती- प्रवीण पोटे

सोलापूर- राजेंद्र राऊत

सांगली सातारा- धैर्यशील कदम

शिवसेना (शिंदे गट)

नाशिक- नरेंद्र दराडे

परभणी-हिंगोली- सईद खान

यवतमाळ- दुष्यंन्त चतुर्वेदी, किरण पांडव,सलीम खातून (संभाव्य)

ठाणे- रवींद्र फाटक

एनसीपी (अजितदादा)

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग- अनिकेत तटकरे

पुणे- विक्रम काकडे (संभाव्य उमेदवार)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now