Vaibhav Sooryavanshi Hose Inside Photos : आयपीएल 2026 मध्ये बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायजर्स हैदराबादवर 47 धावांनी विजय मिळवला. यात राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीची खेळी अतिशय प्रभावी ठरली. एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने 29 बॉलमध्ये 97 धावा केल्या. त्याने यासह ख्रिस गेल डेव्हिड वॉर्नर आणि सनथ जयसूर्या या सारख्या दिग्गजांचे रेकॉर्ड मोडले. तेव्हा आयपीएलचं मैदान गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीचं घर कसं आहे याविषयी जाणून घेऊयात.

१४ व्या वर्षी फलंदाज वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून 2025 मध्ये पदार्पण केलं. तो आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. वैभवने पहिल्याच सीजनमध्ये वेगवान शतक ठोकले आणि त्यासह अनेक रेकॉर्ड नावे केले.

वैभव सूर्यवंशी हा मूळचा बिहार राज्यातील समस्तीपुर जिल्ह्यातील ताजपुर येथील रहिवासी आहे. येथे वैभव आपल्या कुटुंबासोबत राहतो. येथे वैभव आणि त्याचं कुटुंब त्याच्या जुन्या वडिलोपार्जित घरात राहतं.

वैभवच्या ताजपुर येथील घराचं सध्या रिनोव्हेशन काम सुरु असून त्याच्या घराला मुख्यत्वे गुलाबी रंग देण्यात आलाय. वैभवच्या घराजवळ नेट प्रॅक्टिससाठी सुद्धा जागा आहे.

वैभव सूर्यवंशीने वयाच्या ५ व्या वर्षांपासून हातात बॅट घेतली आणि क्रिकेट किट घालून फलंदाज बनवण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. वयाच्या ७ व्या वर्षी, त्याला व्यावसायिक प्रशिक्षणासाठी समस्तीपूर येथील पटेल मैदानावर असलेल्या ब्रिजेश झा यांच्या प्रशिक्षण शिबिरात पाठवण्यात आले.

वैभवच्या वडिलांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘वैभवला क्रिकेटमध्ये करिअर करून देण्यासाठी वडिलांनी शेतजमिनीचा काही भाग विकला. पण वैभवने सुद्धा मग कष्ट करण्यात कोणतीही कसर सोडली नाही आणि त्याला आज मेहनतीचं फळ मिळालं आहे’.

वैभव सूर्यवंशी यांचे वडिलोपार्जित घर आता एका नवीन आणि आकर्षक रूपात दिसणार आहे. यात वैभवच्या ट्रॉफी ठेवण्यासाठी एक विशेष जागा तयार करण्यात येणार असून घराला लावलेला गुलाबी रंग सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

वैभव सूर्यवंशीचं घर हे दुमजली असून खालच्या भागात लिव्हिंग रूम आणि स्वयंपाक घर आणि वरच्या बाजूला टेरेस आणि बेडरूम आहेत.

वैभवच्या वडिलांनी मुलासाठी घराजवळ पीच तयार केली आहे. यातील एक पिच मातीची तर दुसरी सिमेंटची आहे.याच पीचवर वैभवने कोरोना काळात सुद्धा प्रॅक्टिस केली होती.
















