india world

सूर्यग्रहणाचे मोबाईलवरून फोटो काढायचेत? ‘या’ टीप्स करा फॉलो

  • या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज होणार आहे.  या खगोलीय घटनेला आपल्या मोबाईल कैद करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. सूर्यग्रहणाची फोटोग्राफी करायची असेल तर आधी स्वतःची सुरक्षा महत्त्वाची आहे. सूर्याची किरणे आपल्या शरीर आणि डोळ्यांसाठी हानिकारक असतात. त्यासाठी पूर्ण बाह्याचे कपडे घालून डोळ्यांवर सनग्लासेस लावा. 
  • डोक्यावर टोपीही घाला. सूर्यग्रहणाच्या दरम्यान निघणारे किरणे आपल्या कॅमेऱ्यासाठी हानिकारक असतात. यासाठी कॅमेरा लेन्ससमोर एक्स रे किंवा युव्ही फिल्टर चा वापर करा. यामुळे तुमच्या कॅमेऱ्याचा सेन्सर सुरक्षित राहिल आणि कोणतंही नुकसान होणार नाही. सूर्यग्रहण दरम्यान चांगला फोटो येण्यासाठी तसं चांगलं लोकेशन सेट करा. यासाठी खुल्या जागेचा शोध घ्या. अशी जागा शोधा जिथून तुम्हाला आकाश स्वच्छ दिसू शकेल. 
  • तार, पोल, इमारत किंवा इतर कोणताही अडसर येणार नाही, अशी मोकळी जागा शोधल्यास फोटो काढायला सोपं जाईल. फोटो काढण्यासाठी ट्रायपॉडचा वापर करा. यामुळे तुमचा फोटो क्लिअर आणि ब्लरफ्री येईल. तसंच, फोटोची क्वालिटीही वाढते. कॅमेरा हलण्यापासून वाचण्यासाठी बिल्ट इन टायमर किंवा रिमोट शटरचा वापर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button