टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

शेतकऱ्यांसाठी सरकारचा थेट मोठा निर्णय, या योजनेमुळे अखेर टेन्शनच मिटलं; नेमका आदेश काय?

कित्येक शेतकऱ्यांना एक मुद्दा फारच अडचणीचा ठरतो. पंरुत सरकारने आता शेतकऱ्यांचं टेन्शन मिटवून टाकलं आहे. सरकरकडून एका योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांच्या त्या समस्येवर काम केलं जाणार आहे.

शेतकऱ्यांसाठी सरकारचा थेट मोठा निर्णय, या योजनेमुळे अखेर टेन्शनच मिटलं; नेमका आदेश काय?

Chandrashekhar Bawankule : राज्य सरकारने येत्या 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफी केली जाईल, याची घोषणा केलेली आहे. त्या दृष्टीने आता कामही चालू झाले आहे. अधिकाऱ्यांनी या कर्जमाफीसाठी पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी एका प्रकारे ही खुशखबरच असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आणखी एक खुशखबर दिली आहे. त्यांनी राज्यात एक योजना सुरू झाली असून या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होईल, असे सांगितले आहे.

रस्त्यांची मोजणी, अतिक्रमण काढण्याचे काम केले जाणार

बळीराजा पांदण रस्ता योजना, असे बानकुळे यांनी सांगितलेल्या योजनचे नाव आहे. राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ता योजनेची सुरुवात झालेली आहे. या योजनेमध्ये जे शेतरस्ते आहेत त्या रस्त्यांची मोजणी करणे, रस्त्यावरील अतिक्रमण काढणे आणि रस्ता हा वादमुक्त करून घेणे अशी कामे करण्यात येतील. ही जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल खात्याला दिलेली आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना बारमाही रस्ता उपलब्ध होईल

तसेच, या योजनेमुळे शेतकऱ्यांना बारमाही रस्ता उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना रस्ता मिळाला नाही तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दुबार पीक होणार नाही. शेतात पाणी, दिवसाला 12 तास वीज आणि शेतापर्यंत रस्ता पोहोचला तर शेतकऱ्यांचा पुत्र कधीही सरकारी नोकरी मागायला जाणार नाही असं बावनकुळे म्हणाले.

अॅग्री स्टॅक नंबर बंद केले जाणार

ज्या शेतकऱ्यांनी 50 शेतकऱ्यांची वाहतूक अतिक्रमण करून थांबवली, त्या शेतकऱ्यांचे ॲग्री स्टॅक नंबर बंद केले जातील. जेणेकरून पुढचे पाच वर्ष सरकारच्या कुठल्याही योजनेचा लाभ अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते मोकळे करण्याची मोहीम सुरू झालेली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी दगलबाज शिवाजी आणि शिवाजी कोण होता, या दोन पुस्तकांवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. यावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. – संजय गायकवाड विधिमंडळात संदर्भात जेव्हा प्रश्न घेऊन येतील तेव्हा सभागृहासमोर त्याचे नेमके उत्तर देऊ, असे बावनकुळे म्हणाले.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now