टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Donald Trump Attack : अमेरिकेत खळबळ! व्हाईट हाऊसजवळ पुन्हा गोळीबार, डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले

Donald Trump Attack : व्हाइट हाऊसजवळ (Washington Shooting) पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडलीय. शनिवारी संध्याकाळी व्हाइट हाऊसच्या  (White House)  नॉर्थ लॉनजवळ गोळीबार झाल्याची मोठी घटना घडली

Donald Trump Attack : वॉशिंग्टन डीसी येथे ‘व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स असोसिएशन’च्या डिनर कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या उपस्थितीत झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना व्हाइट हाऊसजवळ (Washington Shooting) पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडलीय. शनिवारी संध्याकाळी व्हाइट हाऊसच्या  (White House)  नॉर्थ लॉनजवळ गोळीबार झाल्याची मोठी घटना घडली. यात सुमारे 20 ते 30 गोळ्या झाडल्याचे आवाज ऐकू आले. ही घटना 17th Street आणि परिसरात घडली. दरम्यान या घटनेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुरक्षित आहे. मात्र पुन्हा एकदा घडलेल्या या घटनेनं अमेरिका हादरलं असून राष्ट्राध्यक्षाच्या (Donald Trump)  सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Washington Shooting : सुमारे 20 ते 30 गोळ्या झाडल्याचा मोठा आवाज, FBI च्या पथकाकडून तपास सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, सीक्रेट सर्व्हिसने तातडीने परिसर सील केला. मीडिया सदस्यांना व्हाइट हाऊसच्या ब्रिफिंग रूममध्ये आश्रय दिला. काउंटर-स्नायपर्स छतावर तैनात करण्यात आले आणि संपूर्ण कॉम्प्लेक्स लॉकडाउन करण्यात आलंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यावेळी व्हाइट हाऊसच्या आत होते आणि ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. घटनेची माहिती मिळताच FBI पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. सीक्रेट सर्व्हिस आणि FBI संयुक्तपणे काम करत आहेत. यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, ईस्टर्न टाईमनुसार सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास, संशयित एका सुरक्षा तपासणी नाक्याजवळ आला, त्याने आपल्या बॅकपॅकमधून शस्त्र बाहेर काढले आणि तेथे तैनात असलेल्या अधिकाऱ्यांवर गोळीबार केला. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अंदाजे 30 गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली. दरम्यान एप्रिलमध्ये झालेल्या पत्रकार डिनर दरम्यानच्या गोळीबारानंतरची दुसरी प्रमुख घटना असून आता FBI च्या पथकाकडून कसून तपास सुरु करण्यात आला आहे.

Donald Trump Attack : गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा उपचार दरम्यान मृत्यू

यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या कम्युनिकेशन ऑफिसने ट्विट केले, “शनिवारी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर थोड्याच वेळात, एका व्यक्तीने आपल्या बॅकपॅकमधून शस्त्र काढून 17 व्या स्ट्रीट आणि पेनसिल्व्हेनिया अव्हेन्यूच्या परिसरात गोळीबार केला. सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला आणि संशयिताला गोळ्या घातल्या. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या गोळीबारात एक नागरिही जखमी झाला.

 

US Police : प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोळीबार

सिक्रेट सर्व्हिसने कळवले की, अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला आणि संशयिताला गोळ्या घातल्या. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याचानंतर मृत्यू झाला. या घटनेत एक नागरिकही जखमी झाला. किंबहुना, याबाबत एका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्या नागरिकाला संशयिताने गोळी मारली की प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सिक्रेट सर्व्हिसने कळवले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यावेळी व्हाईट हाऊसमध्ये होते, परंतु या घटनेचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. एजन्सीने असेही सांगितले की, त्यांचा कोणताही कर्मचारी जखमी झाला नाही. अधिकारी जखमी झाला नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा! फोटोने खळबळ, नेमकं काय घडलं?

Horoscope Today 24th May 2026 : रविवारच्या दिवशी असं काही घडणार.. जबराट फायदा होणार, सोशल मीडियाशी निगडीत लोकांना तर मोठी संधी.. वाचा आजचं भविष्य !

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये हाहाकार, रेल्वे ट्रॅकजवळ स्फोट… 23 जणांचा जागीच मृत्यू, 47 जखमी

हॅप्पी बर्थ डे टू यू… अमित ठाकरे यांचा वाढदिवस… शुभेच्छा देण्यासाठी आदित्य ठाकरे शिवतीर्थावर… त्या केकची का मोठी चर्चा

Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका; कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला

Horoscope Today 24th May 2026 : रविवारच्या दिवशी असं काही घडणार.. जबराट फायदा होणार, सोशल मीडियाशी निगडीत लोकांना तर मोठी संधी.. वाचा आजचं भविष्य !

US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा! फोटोने खळबळ, नेमकं काय घडलं?

राघव चड्ढा यांना लागली लॉटरी, भाजपने सोपवली मोठी जबाबदारी; थेट अध्यक्षपदी नियुक्ती