टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

विधान परिषद जागा वाटपाचा काय फॉर्म्युला? भाजपलाच सर्वाधिक जागा? एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर बावनकुळे यांचे मोठे संकेत

Eknath Shinde- Ravindra Chavan-Chandrashekhar Bawankule: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीतील जागा वाटपासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये आज खलबतं झाली. महायुती संदर्भातला निर्णय अंतिम टप्प्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Local Body Legislative Council Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे. महायुतीत जागा पदरात पाडून घेण्यासाठी घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. प्राथमिक बोलणीत एकूण १७ जागांपैकी भाजप १२, शिवसेना ३ व राष्ट्रवादी काँग्रेस २ या फॉर्म्युलावर चर्चा झाली. तर शिवसेनेने अधिक जागांवर दावा सांगितल्याने आज भाजप आणि शिवसेनेत खलबतं झाली. आज सकाळीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला शासकीय निवासस्थानी, नंदनवन येथे पोहचले. या बैठकीनंतर बावनकुळे यांनी महायुती १७ ही जागा जिंकणार असल्याचा दावा केला.

काय म्हणाले बावनकुळे?

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीची माहिती दिली. महायुती संदर्भातला निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे. आता यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून चर्चा करतील. १७ जागेवर महायुती जिंकेल आणि मोठा विजय होईल. जवळपास ९९ टक्के मुद्दांवर एकमत झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सूनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसून उर्वरीत मुद्दावर चर्चा करतील. एक दोन विषय राहिले आहेत त्यावर तिघे अंतिम चर्चा करतील.

जागा वाटपाचा काय असेल फॉर्म्युला?

सध्या जे सिटिंग आहे, त्यांना ती जागा द्यावी आणि नंतर संख्याबळाचा विचार करतो. ज्याचे संख्याबळ अधिक आहे, त्याचा विचार करतो. विधानसभा, लोकसभेवेळी चर्चा करताना हाच फॉर्म्युला होता. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीची चर्चा अंतिम टप्प्याकडे नेली आहे. आता शेवटचा टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत पूर्ण होईल. त्यामुळे भाजप या निवडणुकीत जास्त जागांवर लढण्याची शक्यता आहे.

स्वामित्व योजना-प्रॉप्रटी कार्ड मिळणार

गावठाणात प्रत्येक घरांचा भूमिअभिलेख प्रमाणपत्र द्यायचे आहे. नमूना ८ कधी मिळेल अशी प्रतिक्षा गावकर्‍यांची असायची. अशात हा निर्णय आम्ही घेतला आहे. ग्रामविकास मंत्री यांच्यासोबत चर्चा करत निर्णय झाला आहे. हा महत्त्वाचा निर्णय आहे, ज्यामुळे गावातील लोकांना पण प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे.

पेट्रोल डिझेल टंचाई

खासगीत विरोधक एकमत व्यक्त करतात, पार्टी म्हणून त्यांना भूमिका घ्यावे लागते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत, साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाया करण्याच्या सूचना आहेत. काही ठिकाणी शेतकर्‍यांना डिझेल लागते अशा प्रश्न आहे. सर्वांना काटकसर करावी लागणार आहे, सर्वांना आपलं जीवन यामुळे जगता येईल. काही दिवसांसाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे, लवकरच परिस्थिती आटोक्यात येईल, असे बावनकुळे म्हणाले.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Devendra Fadnavis on Petrol Diesel: देशात तिसऱ्यांदा पेट्रोलचे भाव वाढले, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना डिझेल मिळेना, देवेंद्र फडणवीसांचा जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश

Raju Shetti Sadabhau Khot : राजू शेट्टी अन् सदाभाऊ खोत यांची ‘चाय पे चर्चा’, ऊसदर आंदोलनाचं निमित्त, एकाच टेबलवर गप्पाचा फड

Maharashtra Goverment Cabinet Decision: देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय

100 जणांना घेऊन जाणाऱ्या वऱ्हाडाच्या ट्रकचा पालघरमध्ये भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू तर 25 जण गंभीर जखमी

NCP Merger Sunetra Pawar: सुनेत्रा पवार आता सगळ्यात मोठा डाव टाकणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता

NEET Exam Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये सर्वात मोठी कारवाई, मोटेगावकर क्लासेसचे शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात