टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

नीट पेपर फुट प्रकरणात आणखी एक प्राध्यापिका जेरबंद, पुण्यातून मनिषा हवालदार यांना अटक

On: May 22, 2026 8:28 PM
Follow Us:

नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयला आणखी एक यश मिळाले आहे. या प्रकरणात पुण्यातून मनिषा हवालदार या प्राध्यापिकेला अटक करण्यात आली आहे.

नीट पेपर फुट प्रकरणात आणखी एक प्राध्यापिका जेरबंद, पुण्यातून मनिषा हवालदार यांना अटक

नीट पेपर फुटी प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आधी या प्रकरणात लातूरचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी , मनिषा वाघमारे आणि मनिषा मांढरे यांना अटक केली असतानाच आता या प्रकरणात पुण्यातील आणखी एका प्राध्यापिकेला अटक करण्यात आली आहे. या प्राध्यापिकेचे नाव मनिषा हवालदार असे आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असून नीट परीक्षेचे पेपर फुटल्याने २२ लाख विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. त्यांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.

नीट यूजी 2026 पेपर फूटी प्रकरणात सीबीआयने आणखी एका मास्टमाईंडला अटक केली आहे. सीबीआयने आता या प्रकरणात  प्राध्यापिका मनिषा हवालदार यांना पुण्यातून अटक केली आहे. मनिषा हवालदार यांनी फिजिक्सचा पेपर लीक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात सर्वात लातूर येथील प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना लातूर येथून अटक केली होती. कुलकर्णी हे केमिस्ट्रीचे लेक्चरर आहेत. ते अनेक वर्षे नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेशी संलग्न होते. त्यामुळे त्यांना प्रश्न पत्रिका सहज मिळणे शक्य होते.

आतापर्यंत ११ जणांना अटक झाली

कुलकर्णी यांनी याचा गैरवापर केला आणि संपूर्ण पेपर लीक केल्याचे म्हटले जाते. त्यानंतर मनिषा वाघमारे यांना अटक करण्यात आली. नंतर एनटीएशी संबंधित बायोलॉजीच्या प्रोफेसर मनिषा मांढरे यांना दिल्लीतून अटक करण्यात आली. मनिषा मांढरे या मुळच्या पुण्याच्या आहेत. त्यानंतर आता या प्रकरणात  प्राध्यापिका मनिषा हवालदार यांना अटक झाली आहे.  या प्रकरणात एकूण ११ जणांना अटक झालेली आहे. या प्रकरणात तिन्ही महिला आरोपींची नावे मनिषा असल्याचा योगायोग जुळून आला असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now