टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न

सीबीआयने शिवराज मोटेगावकरला अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले. तत्पूर्वी, ट्रान्झिट रिमांडमध्ये सीबीआयला मोटेगावकरकडून महत्वाची माहिती मिळाली

नवी दिल्ली : देशभरात खळबळ उडवून देणार्‍या नीट पेपरफुटीप्रकरणाचे (NEET) धागेदोरे महाराष्ट्रात सापडले असून सीबीआयने कारवाईचा धडका लावला आहे. पेपरफुटीचे लातूर कनेक्शन समोर आले लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी कोचिंग क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केली आहे. तत्पूर्वी सीबीआयने मोटेगावरची ट्रान्झिट रिमांड घेतली होती, 2 दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडमधील प्राथमिक चौकशीत शिवराज मोटेगावकरकडे महत्त्वाचे पुरावे हाती लागल्यानंतर सीबीआयने (CBI) मोटेगावरकरला अटक करुन आज त्याला सीबीआयच्या कोर्टात (Court) हजर केले होते. त्यावेळी, सीबीआय कोर्टाने आरोपीला 9 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे.

सीबीआयने शिवराज मोटेगावकरला अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले. तत्पूर्वी, ट्रान्झिट रिमांडमध्ये सीबीआयला मोटेगावकरकडून महत्वाची माहिती मिळाली, काही पुरावेही मिळाले, त्यातूनच त्याला अटक करण्यात आली. त्यानुसार, शिवराज मोटेगावकरने 23 एप्रिल रोजी केमिस्ट्रीचा पेपर मिळवला होता, त्याच्या मोबाईलमध्येच लिकड प्रश्नपत्रिका सीबीआयला आढळून आली. तसेच, शिवराज मोटेगावकर हा सेवानिवृत्त प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णीसोबत पेपरफुटीत सहभागी होता, हेही निदर्शनास आले.

सीबीआय कोर्टात न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांना एक प्रश्न विचारला, मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका आहेत हे तुम्हाला कसं कळलं? त्यावर, निवृत्त प्राध्यापक कुलकर्णी हा शिवराजसोबत संपर्कात होता, त्याद्वारे ही बाब समोर आली आहे. येथील कोचिंग सेंटरमार्फतच प्रश्नपत्रिकांचे वितरण सुरू होते, अशी माहिती तपास अधिकारी पवन कौशिक यांनी न्यायालयात दिली. त्यानंतर, सीबीआयने आरोपीसाठी 10 दिवसांची सीबीआय कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. त्यामुळे, पुढील 9 दिवस आता शिवराज मोटेगावकरचा मुक्काम सीबीआय कोठडीत असणार आहे. दरम्यान, तुम्हाला काही पश्चाताप आहे का? असा प्रश्न शिवराज मोटेगावकरला पत्रकारांनी विचारला असता, त्याने पत्रकाराकडे रागाने बघितलं.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा