टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Raja Shivaji Box Office Collection: अखेर, तो क्षण आलाच! ‘राजा शिवाजी’ची 100 कोटींच्या रणांगणात सिंहगर्जना; 17 व्या दिवशीही शौर्याची लाट कायम

On: May 18, 2026 11:41 AM
Follow Us:

Raja Shivaji Box Office Collection: राजा शिवाजी चित्रपटाने आत्तापर्यंतच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत 100 कोटींची कमाई करत सर्वाधिक कमाई  करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या रांगेत मानाची जागा पटकावली आहे.

Raja Shivaji Box Office Collection: जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीची निर्मिती असणारा ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या ऐतिहासिक चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक होण्याचा मान पटकावला आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित राजा शिवाजी हा चित्रपट 1 मे रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनाच्या 17व्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरची पकड मजबूत ठेवत 4.07 कोटी रुपयांची कमाई केली. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार 100 कोटी ग्रॉस कमाई करत 84.55 नेट कमाई केलीय. (Box Office Collection)

राजा शिवाजीची आत्तापर्यंतची घोडदौड

महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या राजा शिवाजी चित्रपटाने प्रदर्शित होतात 13.51 कोटींचं ग्रॉस कलेक्शन करत सर्वात मोठा ओपनिंग कलेक्शन कमावण्याचा विक्रम रचला होता. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 32.3 टक्के ऑक्युपन्सीसह 6,192 शो मिळवत या चित्रपटाने तब्बल 13.51 कोटी रुपयांची दमदार कमाई केली होती. पहिल्या आठवड्यातच 52.65 कोटी रुपयांचा टप्पा पार करणाऱ्या या चित्रपटाच्या कमाईत गेल्या काही दिवसांत थोडी घसरण झाली असली, तरी प्रेक्षकांमधील त्याची लोकप्रियता कायम असल्याचं दिसून येत आहे.

दुसऱ्या शनिवारी विकेंडचा मोठा फायदा चित्रपटाला झाला, तर रविवारी 33.8 टक्के ऑक्युपन्सीसह तब्बल 8 कोटी रुपयांची कमाई नोंदवली गेली. मात्र, सोमवारी चित्र बदललेलं दिसलं. ऑक्युपन्सी जवळपास निम्म्यावर आली असून, अकराव्या दिवशी चित्रपटाने 2.81 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 24.30 कोटी रुपयांचा कलेक्शन केलं. तिसऱ्या आठवड्यात अवघ्या 3 दिवसात 8.97 कोटी रुपयांचा ग्रॉस कलेक्शन केलं. राजा शिवाजी या चित्रपटाने प्रदर्शनाच्या सतराव्या दिवशी एकूण 84.55 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे.

राजा शिवाजीने या चित्रपटांना टाकलं मागे

राजा शिवाजी चित्रपटाने आत्तापर्यंतच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत 100 कोटींची कमाई करत सर्वाधिक कमाई  करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या रांगेत मानाची जागा पटकावली आहे. मात्र, हे ग्रॉस कलेक्शन असल्यामुळे पहिल्या क्रमांकावर अजूनही सैराट चित्रपट कायम आहे. सैराट चित्रपटाने 90 कोटींचे लाइफटाइम कलेक्शन केले होते. मात्र अजून ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची पकड कायम आहे. त्यामुळे नेट कलेक्शनमधेही हा चित्रपट लवकरच पहिला नंबर पटकावेल अशी आशा आहे.

1. सैराट – 90 कोटी
2. राजा शिवाजी – 84.55 कोटी
3. बाई पण भारी देवा – 76.28 कोटी
4. वेड – 61.2 कोटी
5. नटसम्राट – 42 कोटी
6. पावनखिंड – 37.72 कोटी
7. लई भारी – 37 कोटी
8. कट्यार काळजात घुसली – 35 कोटी
9. ठाकरे – 31.6 कोटी
10. टाइमपास – 30 कोटी

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now