टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

शब्दाला किती महत्त्व असतं… ट्रम्प यांचं एक विधान अन् संपूर्ण जगच हादरलं… भारतापासून जपानपर्यंत शेअर बाजारात महाभूकंप… दिवाळंच निघालं

On: May 18, 2026 11:14 AM
Follow Us:

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक शेअर बाजार चिंतेत आहे. अमेरिकन, आशियाई बाजारांसोबतच भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. निफ्टी आणि सेन्सेक्स नकारात्मक स्थितीत व्यवहार करत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असून, ब्रेंट क्रूड $110 पार गेले आहे. या भू-राजकीय घडामोडींचा थेट परिणाम गुंतवणूकदारांवर होत आहे.

शब्दाला किती महत्त्व असतं... ट्रम्प यांचं एक विधान अन् संपूर्ण जगच हादरलं... भारतापासून जपानपर्यंत शेअर बाजारात महाभूकंप... दिवाळंच निघालं

जगभरातील शेअर बाजार (Stock Market Fear) पुन्हा एकदा चिंतेत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. तेल आणि अणुऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांच्या सतत येणाऱ्या बातम्या, तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमक्यांमुळे, अमेरिकेपासून जपानपर्यंतच्या प्रदेशांमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन शेअर बाजार ( US Stock Market) मोठ्या घसरणीसह बंद झाला, तर सोमवारी कामकाज सुरू होताच, आशियाई शेअर बाजारांमध्ये गोंधळ दिसून आला.

ब्रिटन आणि हाँगकाँगसह अनेक देशांमधील शेअर बाजारांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, भारतीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशक मानल्या जाणाऱ्या निफ्टीमध्येही मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. सकाळी निफ्टी जवळपास 200 अंकांनी खाली होता, जे सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी एक निगेटीव्ह संकेत आहेत.

Gift Nifty मध्ये मोठी घसरण

भारतीय शेअर बाजाराचा निर्देशक मानल्या जाणाऱ्या गिफ्ट निफ्टी निर्देशांकाबद्दल जाणून घेऊया. बाजार उघडताच त्यात मोठी घसरण दिसून आली. सकाळी गिफ्ट निफ्टी 195 अंकांनी घसरून 23,550 वर व्यवहार करत होता. या निर्देशांकातील घसरणीचा थेट परिणाम अनेकदा सेन्सेक्स आणि निफ्टीवर होतो. आणि त्याला मिळणारे नकारात्मक सिग्नल हे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होण्याचे संकेत देतात.

जपान, हाँगकाँग ते ब्रिटनपर्यंत भूकंप

एकंदर आशियाई शेअर बाजारांच्या हालचाली पाहिल्या तर जपानचा निक्केई निर्देशांक जवळपास 600 अंकांनी घसरून 60,800 वर ट्रेड करत होता. तर हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांकही 385 अंकांनी, म्हणजेच 1.47 टक्क्यांनी घसरून 25,580 वर आला. याशिवाय, यूकेचा FTSE-100० निर्देशांक जवळपास 200 अंकांनी खाली होता. इतर आशियाई शेअर बाजारांचा विचार केल्यास, दक्षिण कोरियाचा कोस्पी वगळता इतर सर्व निर्देशांकांमध्ये घसरण झाली. DAX (510 अंक) आणि CAC (150 अंक) खाली घसरले होते. कोस्पी मात्र सुमारे 100 अंकांनी वधारला होता.

US Market ही क्रॅश

गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी अमेरिकन शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. Dow Jones 537 अंकांनी घसरून बंद झाला, तर DOw Futures 407 अंकांनी खाली आले. त्याशिवाय S&P सुद्धा किंचित घसरून तो नकारात्मक पातळीवर बंद झाला, तर NASDAQ बद्दल सांगायचं झाल्यास तो 410 हून अधिक अंकांनी कोसळला.

शेअर बाजारात एवढी दहशत का ?

जपानपासून हाँगकाँगपर्यंतच्या शेअर बाजारांमध्ये पसरलेल्या घबराटीमागे अमेरिका आणि इराणमधील तणाव हे एक प्रमुख कारण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्या अव्याहतपणे सुरूच आहेत. रविवारी, त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत नवी धमकी दिली. “इराणसाठी वेळ निघून चालली आहे आणि त्यांनी त्वरीत कारवाई केली पाहिजे, अन्यथा त्यांच्या हाती काहीही उरणार नाही. वेळ अनमोल आहे” असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

क्रूड ऑईलच्या दरात मोठ वाढ

आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होताना दिसत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे ऊर्जा बाजारात खळबळ माजली असून, त्याचा परिणाम ब्रेंट क्रूडच्या किमतींवर झाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, ब्रेंट क्रूडने प्रति बॅरल 110 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. जेव्हा जेव्हा जागतिक कच्च्या तेलाच्या किमती इतक्या झपाट्याने वाढतात, तेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या मासिक बजेटवर त्याचा थेट परिणाम होतो. ट्रम्प यांनी इराणला दिलेला कडक इशारा हे या ताज्या दरवाढीमागील मुख्य कारण आहे.

ब्रेंट क्रूड फ्युचर्स 1.32 टक्क्यांनी (सुमारे 1.44 डॉलर) वाढून प्रति बॅरल 110.70 डॉलरवर पोहोचले, 5 मे नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूडदेखील फार मागे नव्हतं. त्यात 1.75 टक्क्यांची (1.84 डॉलर्स) वाढ होऊन ते प्रति बॅरल 107.26 डॉलर्सवर पोहोचला, ही 4 मे नंतरची सर्वोच्च पातळी आहे. खरं तर, फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि युद्धाला तोंड फुटलं, तेव्हापासून कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now