NEET UG 2026 Re-Exam: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जून 2026 रोजी होणार आहे.

NEET UG 2026 Re-Exam: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जून 2026 रोजी होणार (NEET UG 2026 Re-Exam Schedule) आहे. याबाबत आज एनटीएकडून घोषणा करण्यात आली आहे. 3 मे रोजी झालेली परीक्षा पेपरफुटीच्या घटनांमुळे नीटची परीक्षा रद्द करण्यात आली होती. (NEET Re-Exam On 21 June 2026)
पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली नीटच्या पुर्नरपरीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. एनटीएकडून 21 जूनला नीट पुर्नपरीक्षा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ही परीक्षा जून महिन्यात होणार असल्याने पुढील प्रवेशांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. नीट परीक्षेतील पेपरफुटीमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. वर्षभर तयारी करुन परीक्षा दिल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप निर्माण झाला होता. मात्र, आता लगेचच 21 जूनला नीट पुर्नपरीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळू शकतो. (NEET UG 2026 Re-Exam Date)
नीटची परीक्षा रद्द का झाली? (why neet exam 2026 cancle?)
- राजस्थानातील सीकरमध्ये नीट परीक्षेपूर्वी ‘गेस पेपर’चे वितरण
- ‘गेस पेपर’मध्ये एकूण 410 प्रश्न होते
- ‘गेस पेपर’मधील 120 ते 135 प्रश्न नीटच्या परीक्षेत जसेच्या तसे
- नीटच्या परीक्षेशी जुळलेले बहुतांश प्रश्न रसायनशास्त्र विषयाचे
- प्रश्नांतील साधर्म्य हा अचूक अंदाज की पेपरफुटी याची चौकशी झाली
- प्राथमिक चौकशीतील बाबी पाहून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

नीटच्या परिक्षेबाबत विविध प्रश्नांची उत्तर- (NEET UG 2026 Re-Exam)
1. NEET UG Registration : पुन्हा अर्ज करावा लागणार का?
नाही. विद्यार्थ्यांना नव्याने Registration करण्याची आवश्यकता नाही. NTA कडे आधीपासून उपलब्ध असलेला डेटा पुढील प्रक्रियेसाठी वापरला जाणार आहे.
2. NEET UG Exam Fee : पुन्हा फी भरावी लागणार का?
नाही. विद्यार्थ्यांनी आधी भरलेली परीक्षा फी वैध राहील. अतिरिक्त फी भरण्याची गरज नाही.
3. NEET Fee Refund : आधी भरलेली फी परत मिळणार का?
होय. NTA ने स्पष्ट केले आहे की आधी भरलेली परीक्षा फी नियमांनुसार विद्यार्थ्यांना परत केली जाईल आणि पुनर्परीक्षा NTA स्वतःच्या संसाधनांतून आयोजित करेल.
4. NEET Admit Card : नवीन Admit Card जारी होणार का?
होय. नवीन परीक्षेच्या वेळापत्रकानुसार NTA पुन्हा Admit Card जारी करेल. विद्यार्थ्यांना ते अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येतील. त्याची पूर्वसूचना देण्यात येईल.
5. NEET Exam Centre Choice : पुन्हा परीक्षा केंद्र निवडावे लागेल का?
नाही. विद्यार्थ्यांनी आधी निवडलेले केंद्रांचे पर्याय NTA च्या नोंदीत कायम राहतील.
6. NEET Exam Centre Allocation : तेच परीक्षा केंद्र मिळेल का?
याबाबत अद्याप अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. परिस्थितीनुसार NTA केंद्रांमध्ये बदल करू शकते.
7. NEET New Exam Date : NEET ची नवीन तारीख कधी जाहीर होणार?
सध्या नवीन परीक्षा तारीख जाहीर झालेली नाही. NTA लवकरच सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करणार आहे.
8. NEET Official Schedule : वेळापत्रक कुठे पाहता येईल?
परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक आणि सर्व अपडेट्स NTA Official Website वर उपलब्ध होतील.













