टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

लाडक्या बहिणींना खुशखबर! बँक खात्यावर पैसे जमा; 4500 की 3000 रुपये? लगेच करा चेक!

लाभार्थी महिलांना त्यांनी पुन्हा एकदा केवायसी करावी, अशी सूचना करण्यात आली होती. 31 मार्च 2026 पर्यंत केवायसी करावी, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर 30 एप्रिल 2026 पर्यंत केवायसीची मुदत वाढवण्यात आली होती.

लाडक्या बहिणींना खुशखबर! बँक खात्यावर पैसे जमा; 4500 की 3000 रुपये? लगेच करा चेक!

राज्यातील लाडकी बहीण योजना ही सर्वाधिक चर्चेत असलेली आणि महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिसांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा लाभ दिला जातो. परंतु फेब्रुवारी महिन्यानंतर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात अजूनही पैसे आले नव्हते. म्हणजेच लाडक्या बहिणींना अजूनही मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले नव्हते. म्हणूनच हे पैसे नेमके कधी मिळणार? याची सर्व लाभार्थी महिला वाट पाहात होत्या. आता शेवटी सरकारने हा निर्णय घेऊन टाकला असून महिलांच्या बँक खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाली आहे.

लाडक्या बहिणींना मिळणार होते 3000 रुपये

मे महिना उजडलेला असूनही मार्च आणि एप्रिल अशा दोन महिन्यांचे पैसे खात्यात जमा न झाल्याने लाडक्या बहिणींना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता दोन्ही महिन्यांचे पैसे एकदाच मिळतील असा दावा केला जात होता. म्हणजेच लाडक्या बहिणींना एकदाच थेट 3000 रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे आलेले आहेत. परंतु महिलांना फक्त 1500 रुपयेच मिळाले आहेत. महिलांना 3000 रुपये मिळतील अशी आशा होती. परंतु ही आशा आता अपुरीच राहिली आहे.

महिलांच्या बँक खात्यात किती रुपये आले?

आज अनेक महिलांना त्यांच्या बँक खात्यात 1500 रुपये आल्याचा संदेश आला आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी महिलांनी बँक खाते तपासावे असे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे एका प्रकारे लाभार्थी महिलांचाही आकडा कमी झाला आहे.

दरम्यान, लाभार्थी महिलांना त्यांनी पुन्हा एकदा केवायसी करावी, अशी सूचना करण्यात आली होती. 31 मार्च 2026 पर्यंत केवायसी करावी, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर 30 एप्रिल 2026 पर्यंत केवायसीची मुदत वाढवण्यात आली होती.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा