टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

अवघ्या तासाभराच्या पावसाने साताऱ्यात हाहा:कार, घरे, झाडे कोलमडली, अख्खी रात्र पावसात भिजत; गावकरी भयभीत

राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. कुठे कडाक्याचे उन्ह तर कुठे अवकाळी पाऊस अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले.

अवघ्या तासाभराच्या पावसाने साताऱ्यात हाहा:कार, घरे, झाडे कोलमडली, अख्खी रात्र पावसात भिजत; गावकरी भयभीत

राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. कुठे पाऊल तर कुठे उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आज उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला. अवकाळी पावसाने राज्यातील काही भागात थैमान घातले. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा सातारा शहराला मोठा फटका बसला. काल संध्याकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सुमारे 40 घरांचे नुकसान झाले. या भागात अनेक घरांवर विद्युत पोल आणि झाडे पडली.  तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामध्ये बामनोली जवळच्या शिवसागर जलाशयात दोन पर्यटकांना घेऊन निघालेली बोट बुडाली. दोन्ही पर्यटक पाण्यातून पोहून बाहेर सुखरूप निघाले. मात्र, शिवसागर बोट क्लबमधील बोटीचा चालक बेपत्ता आहे, रुपेश धोंडीबा तांबे असे बोट चालकाचे नाव असून त्याचा शोध घेतला जातोय.

सातारा सदर बाजार लक्ष्मी टेकडी परिसरात सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे येथील 40 घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी रात्री उशिरा आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांसह पालिकेचे मुख्याधिकारी यांच्यासमवेत नुकसानीची पाहणी केली. परभणीमध्ये अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे.

अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे जिंतूर ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या महामार्गावर झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. शिरूर तालुक्यातील शिंदोडी गावाला वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे मोठे झाड उन्मळून पडून रांजणगाव औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस फिडरच्या तारांवर कोसळले. या घटनेत फिडरच्या तारा तुटून जवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर पडल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावलीय. दौंड तालुक्यातील केडगावमध्ये वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह तूफान पावसाची हजेरी लावली. कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच अवकाळी पावसाने कहर केला. या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे बघायला मिळतंय.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

मोठी बातमी! शिवसेना नेत्यांचे सर्व परदेश दौरे रद्द, ताफाही कमी केला, एकनाथ शिंदेंनी देखील घेतला मोठा निर्णय

थलपती विजय यांचे सरकार धोक्यात, बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच थेट धक्का, ऐनवेळी..

Todays Gold Rate : आता सोने घेणे विसराच, एका रात्रीत सोने आणि चांदीचे भाव गगनाला, चांदी 20 हजारांनी महाग तर सोने तब्बल..

बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं; अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच आज हादरवणारं घडलं

Gold-Silver Price Today: एकीकडे नरेंद्र मोदींचे आवाहन, दुसरीकडे सलग दोन दिवस सोन्याचे दर घसरले

Sunetra Pawar On NCP National Executive List: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून पटेल, तटकरेंची नावं गायब, पत्र व्हायरल होताच सुनेत्रा पवारांकडून स्पष्टीकरण