टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मोठी बातमी! तामिळनाडूमध्ये आता थलपती विजय सरकार; शेवटच्या क्षणी गेम फिरवला, बहुमताचा आकडा जुळून दाखवला

तामिळनाडूच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे, शेवटी थलपती विजय यांच्याकडे आता बहुमत झाले असून, टीव्हीकेचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. थलपती विजय रविवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! तामिळनाडूमध्ये आता थलपती विजय सरकार; शेवटच्या क्षणी गेम फिरवला, बहुमताचा आकडा जुळून दाखवला

तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. अखरे थलपती विजय यांचा राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. थलपती विजय यांच्या टीव्हीकेला विधानसभा निवडणुकीत 108 जागा मिळाल्या होत्या, त्यांना बहुमतासाठी 10 जागांची गरज होती. मात्र ही जुळवाजुळ करण्यासाठी थलपती विजय याना तारेवरची कसरत करावी लागली. परंतु अखेर त्यामध्ये आता टीव्हीकेला यश आलं आहे. थलपती विजय हेच आता तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हे जवळपास निश्चित झालं आहे. टीव्हीकेकडे स्वत:चे 108 आमदार होते, त्यानंतर टीव्हीकेला काँग्रेसने पाठिंबा दिला. काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर देखील टीव्हेकीला बहुमतासाठी 6 आमदारांची गरज होती. काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर सीपीएम आणि सीपीए या डाव्या पक्षांनी देखील थलपती विजय यांना पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळे टीव्हीके कडील आमदारांची संख्या 116 झाली मात्र तरी देखील दोन आमदारांची गरज होती.

सुरुवातीला जर आमचा पाठिंबा पाहिजे असेल तर आम्हाला उपमुख्यमंत्रिपद आणि काही महत्त्वाची खाती द्यावी लागतील अशी अट व्हिसीके पक्षाने थलपती विजय यांच्यापुढे ठेवली होती. मात्र आता समोर आलेल्या बातमीनुसार व्हिसीकेनं टीव्हीकेला कोणतीही अट न ठेवता पाठिंबा जाहीर केला आहे. फक्त व्हिसीकेच नाही तर आययुएमएलने देखील थलपती विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आता थलपती विजय यांच्याकडे 120 आमदार झाले असून, बहुमतापेक्षा या आमदारांची संख्या दोन ने अधिक आहे, त्यामुळे आता थलपती विजय यांच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. हा राजकारणात नवीन असलेल्या थलपती विजय यांच्यासाठी मोठा दिलासा माण्यात येत आहे.

दरम्यान पक्षांचा पाठिंबा मिळताच आता तामिळनाडूमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. थलपती विजय यांनी आमदारांच्या सह्यांचं पत्र सादर करण्यासाठी आणि सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितला आहे. त्यामुळे आता तामिळनाडूनत टीव्हीके सत्तेमध्ये तर डीएमके विरोधी पक्षात असं चित्र आता पहायला मिळण्याची शक्यता आहे. अखेर आता तामिळनाडूमधून सत्ता स्थापनेचा पेच सुटला आहे.  रविवारी दुपारी तीन वाजता थलपती विजय हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now