टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Sharad Pawar: आजारपणातून बरे होताच शरद पवारांचा पहिला दौरा ‘सातारा’; कर्मवीरांच्या नगरीत मुक्कामी, भाषणाकडे सर्वांचे लक्ष

Sharad Pawar: रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 67 व्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सातारा : राज्यसभा खासदारकीची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad pawar) थेट रुग्णालयात दाखल झाले होते. सुप्रिया सुळे यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली होती, तर बारामती विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी स्वत: शरद पवार यांनी ट्विटरवरुन प्रकृतीची माहिती दिली, तसेच मी बारामती विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला येऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर, रुग्णालयातून बरे होऊन ते घरी परतले आहेत. आता, काही दिवस आराम केल्यानंतर शरद पवार पुन्हा सक्रीय होत असून त्यांचा पहिलाच दौरा दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या साताऱ्यातून (Satara) होत आहे.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 67 व्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या कार्यक्रमाची सर्वाधिक चर्चा आहे ती शरद पवार यांच्या उपस्थितीची. आजारातून बरे झाल्यानंतर साताऱ्यातील हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे केवळ रयत शिक्षण संस्थाच नाही, तर संपूर्ण राज्याचं लक्ष या दौऱ्याकडे लागलं आहे. शरद पवार हे 8 मे रोजी संध्याकाळी मुक्कामीच साताऱ्यात येणार असून 9 मे ला सकाळी साडेआठ वाजता कर्मवीर समाधीचे दर्शन घेतील. त्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमात शरद पवार अध्यक्षस्थान भूषवणार असून त्यांच्या हस्ते विविध गुणवंत रयत सेवकांचा सत्कार, ‘रयत मासिक’, ‘रयत विज्ञान पत्रिका’ आणि ‘कर्मवीर सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

याशिवाय शैक्षणिक, सामाजिक आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. पण या सर्व कार्यक्रमांपेक्षा आता उत्सुकता आहे ती शरद पवार नेमकं काय बोलणार याची. सातारा आणि शरद पवार यांचं राजकीय आणि भावनिक नातं कायमच विशेष राहिलं आहे. त्यामुळे याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. तसेच, साताऱ्या दौऱ्यात त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या कराडमधील प्रतिसंगम या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावरही ते जातील का, हेही अद्याप नश्चित नाही. मात्र, शरद पवार पुन्हा सक्रीय झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा नवसंचार येईल.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा