टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

TVK सर्वात मोठा पक्ष असूनही राज्यपालांनी अट टाकून तिढा वाढवला, विजय थलपति मोठं पाऊल उचलणार?

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यांनी द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन प्रस्थापित पक्षांना शह दिला होता

Vijay Thalapathy Tamil Nadu Government Formation: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या टीव्हीके पक्षाचा सर्वेसर्वा विजय थलपतिच्या मुख्यमंत्रि‍पदी (Tamil Nadu CM) बसण्याच्या मनसुब्यांना तुर्तास धक्का बसला आहे. विजय थलपति (Vijay Thalapathy) यांनी गुरुवारी किंवा शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या तयारीत होते. त्यादृष्टीने विजय थलपती हे बुधवारी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर (Governor Rajendra Arlekar) यांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र, त्यावेळी राज्यपालांनी टाकलेल्या एका अटीने विजय थलपति यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नाला धक्का बसला आहे. राज्यपालांनी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 आमदारांचा पाठिंबा असलेलं पत्र आधी द्या, अशी मागणी केली आहे. (Tamilnadu Vidhan Sabha Election Result 2026)

विजय थलपति यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसच्या पाच आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या दोघांचे एकत्रित संख्याबळ 113 इतके झाले आहे. तामिळनाडूच्या 234 जागांच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 118 च्या संख्याबळाची गरज आहे. त्यामुळे सध्या टीव्हीकेला बहुमतासाठी पाच जागा कमी पडत आहेत. याशिवाय, विजय थलपति दोन मतदारसंघातून निवडून आल्यामुळे टीव्हीकेचे प्रत्यक्ष संख्याबळ 107 इतकेच मोजले जाऊ शकते, असा अंदाज आहे.

या सगळ्यामुळे विजय थलपति यांच्या टीव्हीके पक्षाची चिंता वाढली आहे. सर्वात मोठा पक्ष असूनही राज्यपालांनी आपल्या सत्तास्थापनेसाठी (Tamil Nadu Government Formation) निमंत्रण दिले नाही, ही बाब टीव्हीके पक्षाला फार रुचलेली नाही. टीव्हीके पक्षाने शपथविधीची सगळी तयारी केली होती. आज नेहरु स्टेडियमवर टीव्हीकेचे समर्थक जमणार होते. मात्र, राज्यपालांच्या भूमिकेमुळे हे सर्वजण निराश झाले आहेत. त्यामुळे आता विजय थलपति यांच्याकडून राज्यपालांच्या भूमिकेविषयी कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे. यानंतर टीव्हीके पक्ष काय भूमिका घेणार, हे बघावे लागेल.

Tamil Nadu Government Formation: अण्णाद्रमुकचे  47 पैकी 28 आमदार अचानक रिसॉर्टवर पोहोचले, चर्चांना उधाण

अण्णाद्रमुकच्या 47 पैकी 28 आमदारांना पुद्दुचेरीला नेण्यात आले आहे. या सर्वांना येथील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. अण्णाद्रमुक पक्षातील एक गट फुटून विजय थलपति यांच्या टीव्हीकेला पाठिंबा देईल, अशी चर्चा कालपासून सुरु आहे. या बंडाचे नेतृत्व सी.व्ही. षण्मुगम हे करत आहेत.

तामिळनाडू विधानसभेतील पक्षीय बलाबल- (Tamilnadu Election Result 2026)

टीव्हीके-108
द्रमुक- 59
अण्णाद्रमुक- 47
काँग्रेस- 5
इतर-08

एकूण जागा-234

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now