टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

बच्चू कडूंना आधी प्रवेश, मग शिवसेनेकडून विधान परिषदेची संधी, दुसरं नावही उघड; कुणाचा झाला पत्ताकट?

On: April 30, 2026 1:19 PM
Follow Us:

Eknath Shinde Shivsena Bachchu Kadu: बच्चू कडू यांचा आज अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश झाला. दोन दिवसांपासून या मुद्यावरुन राजकारण तापलेलं होतं. कडू हे शिंदे सेनेचे विधान परिषदेचे अधिकृत उमेदवार असतील. तर आता दुसरं नावही समोर आलेले आहे. मग कुणाचा पत्ता झाला कट?

Vidhan Parishad Bachchu Kadu Shivsena: एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेसाठी एक मोठा गेम खेळला आहे. आक्रमक आणि लढाऊ नेते बच्चू कडू यांना मैदानात उतरवले आहे. त्याअगोदर बच्चू कडू यांचा शिवसेनेत अधिकृत पक्ष प्रवेश झाला. त्यांचा प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेनेत विलीन झाला. त्याचवेळी शिंदे सेनेच्या दुसर्‍या चेहऱ्याचीही लवकरच घोषणा होणार आहे. हा चेहराही निश्चित झाला आहे. त्यामुळे आज अर्ज भरण्याच्या अगदी काही तास अगोदर बड्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यात कुणाचा पत्ता कट झाला?

बच्चू कडू विधान परिषदेवर

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेनेत आज अधिकृत प्रवेश केला आहे. सकाळीच एकनाथ शिंदे यांच्या भेटीला ते पोहचले. आता थोड्याच वेळात याविषयीची घोषणा होईल. तर काल त्यांनी सांगितल्याप्रमाणे उमेदवारीसाठीची कागदपत्रांची बॅग त्यांच्या जवळच आहे. त्यामुळे पक्ष प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम होताच ते थेट विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करतील. कडू यांना येत्या सहा महिन्यात मंत्री पदही देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विदर्भात शिवसेनेचा आवाज बुलंद होणार आहे. तर त्यांची आक्रमकता ही महाविकास आघाडीसह भाजपसाठी आव्हान उभं करेल अशी चर्चा ही सुरू झाली आहे.

दुसरा उमेदवार कोण?

तर शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेवर नावे निश्चित झाली आहे. दुसरे नाव नीलम गोऱ्हे यांचे आहे. तर या स्पर्धेतून शीतल म्हात्रे यांचे नाव बाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर विधान परिषदेसाठी आज अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे. 30 एप्रिल रोजी अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे. थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दोन्ही नेते विधान भवनात उमेदवारी अर्ज भरतील.

दहावा उमेदवार कोण?

महायुतीचे नऊही उमेदवार निश्चित झाले आहेत. भाजपने सहा उमेदवारांची कालच घोषणा केली होती. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीने झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेची उमेदवार दिली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी दिली आहे. आज जर काँग्रेसने मोठा खेला केला तर दहावा उमेदवार कोण द्यायचा याची खलबतंही सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता दहावा उमेदवार हा महायुतीमधून कोणत्या पक्षाचा असले याची उत्सुकता ताणल्या गेली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now