Parrot : पोपटांनी डाळिंबाच्या बागेचे नुकसान केल्यानंतर, वर्ध्यातील एका शेतकऱ्याने 10 वर्षे कायदेशीर लढा दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आता नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

वर्ध्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातील डाळींबाचे पोपटांमुळे नुकसान झाले होते. हिंगणी येथील शेतकरी महादेव डेकाटे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. यात त्यांनी पोपटांमुळे बागेचे नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी केली होती. आता दहा वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पोपटामुळे डाळिंब बागेच नुकसान झालेल्या शेतकऱ्याला शासनाने नुकसान भरपाई द्यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा रंगली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पोपटांनी केले पिकांचे नुकसान
शेतकरी महादेव डेकाटे यांचे वकील अभिजित सांभरे यांनी म्हटले की, डाळिंबाची लागवड केल्या तर 2016 हे प्रकरण आहे. जंगली पोपटाच्या थव्याने त्यांच्या डाळिंब फळांचे आणि फुलांचे नुकसान केले होते. त्यावेळी वनविभाग आणि जिल्हाधिकारी यांना माहिती देऊन पंचनामे करण्यात आले होते. मात्र जंगली पक्षांनी केलेल्या नुकसान भरपाई देण्याची तरतूद नाही असं कारण प्रशासनाने दिले होते. त्यानंतर शेतकऱ्याने कोर्टात धाव घेतली होती.

शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
आता या प्रकरणावर निकाल देताना नागपूर खंडपीठाने म्हटले की, वन्य प्राण्यांनी नुकसान केल्यास नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था आहे. तसेच वन्य पक्षी प्राणी वाईल्डलाईफ प्रोटेक्शन अंतर्गत संरक्षित असेल आणि त्यांना वन्यजीव संरक्षणाचे नियम आणि फायदे लागू होतात. अशा परिस्थितीमध्ये पक्षांनी नुकसान केल आहे, या बाबीसाठी नुकसान भरपाई नाकारू शकत नाही असं म्हणते शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोपट हा सुद्धा आता वन्यप्राणी ठरला आहे.
वन्य प्राणी आणि पक्षी यात भेद करता येणार नाही
कोर्टाने शेतकऱ्याचे हित आणि वन्य प्राण्याबाबत असलेल्या नियमांचा विचार करत वन्य प्राणी आणि वन्य पक्षी यात भेदभाव करता येणार नाही असे म्हटले. वन्य पक्षाने हे जर पिकाच नुकसान केलं आहे. तर त्याला सरकारने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. त्यामुळे दोनशे रुपये प्रति झाड याप्रमाणे 200 झाडासाठी शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत.













