टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी विमान मालकाच्या खात्यात 9 कोटी, दुसऱ्या दिवशी त्याहून मोठी… रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ

Rohit Pawar : रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या प्रकरणासंदर्भात खळबळजनक दावे केले असून, घटनेच्या दिवशीच कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.

अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी विमान मालकाच्या खात्यात 9 कोटी, दुसऱ्या दिवशी त्याहून मोठी... रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ

अजित पवार यांच्या निधनाला 3 महिने पूर्ण झाले आहेत. या अपघात प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. अशातच आज रोहित पवार यांनी अजित पवार पवार यांच्या विमान अपघातावर खळबळजनक विधान केले आहे. रोहित पवार यांनी म्हटले की, आज अपघाताला तीन महिने पूर्ण होत आहेत. आमच्या कडे जे पुरावे आले आहेत ते देणार आहोत. काय वस्तुस्थिती आहे त्याची माहिती देण्यासाठी आज आम्ही आलो आहोत. कर्नाटकमध्ये जो FIR दाखल केला, तो आता CID कडे पाठवला आहे अशी माहिती दिली आहे.

अजित दादांच्या निधनादिवशी व्ही के सिंगला बक्षीस दिले – रोहित पवार

रोहित पवार यांनी आज या अपघाताबाबत खळबळजनक दावा केला आहे. अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान VSR कंपनीचे आहे, ज्याचे मालक व्ही के सिंग आहेत. याबाबत बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, ‘अजित दादांचा अपघात सकाळी झाला तेव्हा व्ही के सिंगला बक्षीस म्हणून 9 कोटी 81 लाख रुपये दिले, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे अजित दादांचा अंत्यविधी सुरू होता तेव्हा 16 कोटी 88 लाख रुपये दिले. आतापर्यंत 145 कोटी सिंग ला दिले आहेत.’

घराबाहेर पूजा करण्यात आली

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, खरातचा अँगल आम्ही हाती घेतला नव्हता, तो ही हाती घ्यायचा आहे. अजित दादांच घर काटेवाडीला आहे. बारामतीचा छोटा नेता आहे तो खरातच्या संपर्कात होता. त्या छोट्या नेत्याचे आर्थिक संबंध आहेत. काटेवाडीच्या घरा बाहेर पूजा छोट्या नेत्याचा माध्यमातून केली. आम्ही यावर विश्वास ठेवत नाही मात्र घराच्या बाहेर 3 पूजा का झाल्या? 27,28 आणि 29 तारखेला उलाढाली का वाढल्या? पवार परिवारावर फार मोठा आघात होवू शकतो अस खरातने एका शेतकऱ्याला सांगितलं होत असा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.

आम्ही कुणालाही सोडणार नाही – पवार

रोहित पवार यांनी म्हटले की, छोटा नेता आहे तो खरातकडे जाऊन पूजा करत होता. दादांचे जे काही नेते आर्थिक व्यवहार करत होते त्याच्याशी तो संपर्कात होता. काही नेत्यांनी अंगठे आणि करंगळ्या कापल्या होत्या. आम्ही कोणाला सोडणार नाही. मोठ्या नेत्याला न्याय मिळत नसेल तर सामान्यांना काय मिळणार? असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now