टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Vaibhav Sooryavanshi Video : एका फोटोची किंमत 100 रुपये…; वैभव सूर्यवंशीने जे केलं, ते पाहून चाहतेही हादरले, नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi Viral Video : भारतीय क्रिकेटमध्ये नव्याने उदयाला आलेल्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने सध्या आयपीएलमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

Vaibhav Sooryavanshi Viral Video : भारतीय क्रिकेटमध्ये नव्याने उदयाला आलेल्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने सध्या आयपीएलमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या 14व्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण करत त्याने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू होण्याचा मान मिळवला. आता तर त्याने थेट टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी जोरदार दावेदारीही सादर केली आहे. फक्त 15 वर्षांचा हा विस्फोटक फलंदाज आज जगभरात लोकप्रिय झाला असून, चाहत्यांची त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी अक्षरशः रांग लागते. अलीकडेच त्याचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तो लहान मुलांकडून फोटोसाठी 100 रुपये मागताना दिसतो.

सनराइजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात वैभवने अवघ्या 36 चेंडूत शतक ठोकत गोलंदाजांची झोप उडवली. याआधीही त्याने 35 चेंडूत शतक झळकावून एक विक्रम प्रस्थापित केला होता. आयपीएलमधील सर्वात जलद शतकांच्या यादीत त्याने टॉप-3 मध्ये स्थान मिळवले असून, पहिल्या क्रमांकावर क्रिस गेल आहे, तर पुढील दोन स्थानांवर वैभवचं नाव आहे.

मैदानावर आक्रमक आणि निर्दयी फलंदाजी करणारा वैभव मैदानाबाहेर मात्र तितकाच खोडकर आणि मजेशीर स्वभावाचा आहे. राजस्थान रॉयल्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही लहान मुले त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी आली असता त्याने गंमतीत “एका फोटोसाठी 100 रुपये लागतील” असे सांगितले. हे ऐकून मुले थोडी निराश झाली आणि मागे फिरू लागली.

मात्र वैभवने त्यांना परत बोलावलं आणि पुन्हा हसत म्हणाला, “पैसे द्याल का? 100 रुपये लागतील.” त्यावर एका मुलाने निरागसपणे “माझ्याकडे 200 रुपये आहेत, माझ्या मित्रासोबत फोटो काढू का?” अशी विनंती केली.

 

शेवटी वैभवने हा सगळा प्रकार फक्त मजा म्हणून केल्याचं सांगितलं आणि मुलांना कॅमेऱ्याकडे दाखवत सांगितलं की फोटोसाठी कोणतेही पैसे लागणार नाहीत. हे कळताच मुले आनंदाने उड्या मारू लागली. अशा या भन्नाट शैलीमुळे आणि मैदानावरील तुफानी कामगिरीमुळे वैभव सूर्यवंशी सध्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

हे ही वाचा – 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now