टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Donald Trump: व्हाईट हाऊसमध्ये गोळीबाराचा मोठ्यानं आवाज, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ डोनाल्ड ट्रम्प यांना घेरलं; हल्लेखोराला क्षणात लोळवलं, पहिला फोटो आला समोर

On: April 26, 2026 11:08 AM
Follow Us:

गोळीबारानंतर लगेचच, सिक्रेट सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांनी ट्रम्प यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. तर गोळीबार करणाऱ्या एकाला पोलिसांकडून लगेच अटक देखील करण्यात आली असून, संशयिताचा फोटोही आता समोर आला आहे.

America Donald Trump News : अमेरिकेत व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनरमध्ये अचानक गोळीबार झाल्याच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump News) आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प (Melania Trump) देखील उपस्थित होत्या. गोळीबारानंतर लगेचच, सिक्रेट सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांनी ट्रम्प यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. तर गोळीबार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांकडून लगेच अटक देखील करण्यात आली असून, संशयिताचा फोटोही आता समोर आला आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यासोबत उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प उपस्थित होत्या. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती आहे. तर यूएस सिक्रेट सर्व्हिसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स, मेलानिया ट्रम्प आणि संपूर्ण मंत्रिमंडळाला बाहेर काढण्यात आले असून सर्वजण सुरक्षित आहेत.

America Donald Trump News : कोण आहे हल्लेखोर

-हल्लेखोराचे नाव कोल अॅलन असून तो पेशाने शिक्षक असल्याची माहिती आहे.

-31 वर्षीय हल्लेखोर कॅलिफोर्नियातील टोरान्सचा राहणारा आहे.

-हॉलच्या प्रवेशद्वारावर तपासणीसाठी मॅग्नेटोमीटर होते

-हॉलमध्ये हल्लेखोर ट्रम्प यांच्यापासून 50 यार्डांपर्यंत पोचला होता

-‘एवढी शस्त्रे घेऊन हल्लेखोर शिरला कसा’ असे ट्रम्पकडून आश्चर्य

-हल्ल्यावेळी ट्रम्प,पत्नी मेलानिया,उपाध्यक्ष व्हान्स आणि अनेक मंत्री उपस्थित होते

-हल्ला झाला तेव्हा हॉलमध्ये दीडशे ते दोनशे लोकांची उपस्थिती

Donald Trump: व्हाईट हाऊसमध्ये गोळीबाराचा मोठ्यानं आवाज, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ डोनाल्ड ट्रम्प यांना घेरलं; हल्लेखोराला क्षणात लोळवलं, पहिला फोटो आला समोर

Donald Trump News : आवाज ऐकताच, सिक्रेट सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना घेरले

मिळालेल्या माहितीनुसार, हा गोळीबार बॉलरूमच्या अगदी वरच्या खोलीत झाला. आवाज ऐकताच, सिक्रेट सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना घेरले आणि त्यांना मंचावरून सुरक्षितपणे खाली आणले. गोळीबाराच्या व्हिडिओमध्ये दिसते की, हा गोळीबार ट्रम्प यांच्या अगदी समोर झाला. अचानक गोळीबार सुरू झाला तेव्हा ट्रम्प मंचावर बसले होते आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना घेरले. यावेळी अनेक लोक टेबलांखाली लपले.

Donald Trump : गोळीबाराच्या घटनेबाबत ट्रम्प काय म्हणाले?

गोळीबाराच्या घटनेबाबत, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत लिहिले, “आज संध्याकाळी डीसीमध्ये खूप धावपळ होती. सिक्रेट सर्व्हिस आणि सुरक्षा यंत्रणांनी उत्कृष्ट काम केले. त्यांनी मोठे शौर्य आणि चपळाई दाखवली. गोळीबार करणाऱ्याला पकडण्यात आले आहे. मी शिफारस केली आहे की आपण कार्यक्रम सुरू ठेवावा, परंतु आम्ही पुढील निर्णय पूर्णपणे सुरक्षा यंत्रणांच्या आधारावर घेऊ. आजची संध्याकाळ अपेक्षेप्रमाणे पार पडली नाही आणि आम्हाला तो पुन्हा आयोजित करावा लागेल.”

दरम्यान, एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, या घटनेनंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, तपास सध्या सुरू आहे. सुरक्षा यंत्रणा संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांच्या सुरक्षेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now