टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

गोळीबार झाला तेव्हा डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये काय करत होते? मोठी माहिती समोर

On: April 26, 2026 10:59 AM
Follow Us:

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हिल्टन हॉटेलमध्ये हल्ला झाल्यामुळे जगात खळबळ उडली आहे. पण जेव्हा हल्ला झाला तेव्हा डोनाल्ट ट्रम्प हॉटेलमध्ये काय करत होते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घ्या…

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथील हिल्टन हॉटेलमध्ये अचानक खळबळ उडाली. येथे 'व्हाईट हाऊस करस्पॉन्डेंट्स डिनर' सुरू असताना अचानक गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण कार्यक्रमात भीतीचे वातावरण पसरले. घटनेच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये उपस्थित होते. त्याच वेळी सुरक्षा यंत्रणांना धोक्याचा इशारा मिळाला आणि काही सेकंदातच सर्व वातावरण बदलले.

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथील हिल्टन हॉटेलमध्ये अचानक खळबळ उडाली. येथे ‘व्हाईट हाऊस करस्पॉन्डेंट्स डिनर’ सुरू असताना अचानक गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण कार्यक्रमात भीतीचे वातावरण पसरले. घटनेच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये उपस्थित होते. त्याच वेळी सुरक्षा यंत्रणांना धोक्याचा इशारा मिळाला आणि काही सेकंदातच सर्व वातावरण बदलले.

1 / 6

डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊस करस्पॉन्डेंट्स डिनरमध्ये सहभागी झालेल्या पाहुण्यांना संबोधित करत होते. हा एक प्रतिष्ठित कार्यक्रम असतो, ज्यामध्ये प्रसारमाध्यमे, राजकारणी आणि सरकारचे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी होतात. मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण सुरू असतानाच अचानक गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू आला. हे ऐकताच तिथे हजर असलेले अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसचे एजंट त्वरित सक्रिय झाले.

2 / 6

सीक्रेट एजंट्सनी कोणताही वेळ न घालवता 'ह्यूमन शील्ड' (मानवी ढाल) तयार करून ट्रम्प यांना कव्हर केले आणि आपत्कालीन प्रोटोकॉलअंतर्गत त्यांना सुरक्षित मार्गाने बाहेर काढले. या तत्परतेमुळे आणि सतर्कतेमुळे संभाव्य मोठा धोका टळला आणि ट्रम्प पूर्णपणे सुरक्षित राहिले.

सीक्रेट एजंट्सनी कोणताही वेळ न घालवता ‘ह्यूमन शील्ड’ (मानवी ढाल) तयार करून ट्रम्प यांना कव्हर केले आणि आपत्कालीन प्रोटोकॉलअंतर्गत त्यांना सुरक्षित मार्गाने बाहेर काढले. या तत्परतेमुळे आणि सतर्कतेमुळे संभाव्य मोठा धोका टळला आणि ट्रम्प पूर्णपणे सुरक्षित राहिले.

3 / 6

या घटनेच्या वेळी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वॅन्स आणि ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्यही कार्यक्रमात उपस्थित होते. सुरक्षा यंत्रणांनी त्यांनाही तातडीने तिथून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवले. सर्व वरिष्ठ नेते सुरक्षित असून कोणालाही इजा झाली नसल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली आहे.

4 / 6

घटनेच्या साधारण एक तासानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली की, संशयित हल्लेखोराला पकडण्यात आले आहे. या शूटरची ओळख ३१ वर्षीय कोल थॉमस अशी झाली असून तो कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे.

घटनेच्या साधारण एक तासानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली की, संशयित हल्लेखोराला पकडण्यात आले आहे. या शूटरची ओळख ३१ वर्षीय कोल थॉमस अशी झाली असून तो कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे.

5 / 6

ट्रम्प यांनी सुरक्षा यंत्रणांचे कौतुक करताना लिहिले की, त्यांनी अत्यंत वेगाने आणि धैर्याने कारवाई केली. कार्यक्रम सुरू राहावा अशी आपली इच्छा होती, परंतु अंतिम निर्णय कायदा अंमलबजावणी संस्थाच घेतील, असेही त्यांनी नमूद केले.

6 / 6
\

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now