टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

आरडाओरड… किंचाळ्या… काळजाचा थरकाप उडाला, मुलं बुडताना पाहून आई धावली अन्… सोलापुरातील मन सुन्न करणारी घटना

Follow Us:

सोलापूर जिल्ह्यातील खडकी येथे एक मन हेलावणारी घटना घडली आहे. मुलांना तलावात बुडताना पाहून आईने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण तिला पोहता येत नसल्याने तीही बुडाली. तिघा मायलेकरांचा जीव वाचू शकला नाही. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, मुलांचे मृतदेह अजूनही बेपत्ता असल्याने कुटुंबीय आणि गावकरी हवालदिल झाले आहेत.

आरडाओरड... किंचाळ्या... काळजाचा थरकाप उडाला, मुलं बुडताना पाहून आई धावली अन्... सोलापुरातील मन सुन्न करणारी घटना

मुलं बुडत होते म्हणून आई त्यांना वाचवण्यासाठी धावली. तिनेही पाण्यात उडी मारली. पण पोहता येत नसल्याने ती स्वत: बुडायला लागली. वाचण्यासाठी तिघा मायलेकांचा आक्रोश सुरू झाला. आरडाओरड सुरू होती. किंचाळ्या सुरू होत्या. पण तिघेही वाचू शकले नाहीत. बघता बघता दोन मुलांसह आईही पाण्यात बुडाली. ही घटना पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. मन सुन्न झालं. आईचा मृतदेह काठावर ठेवला तेव्हा अख्ख्या गावाने हंबरडा फोडला. दोन्ही मुलं अजून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. सोलापुरात ही हादरवणारी घटना घडली आहे. या घटनेवर सर्वचजण हळहळ व्यक्त करत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथे ही अत्यंत दुर्देवी घटना घडली. गुरुवारी सकाळी वैशाली अनिल घोडके ही 35 वर्षाची महिला तिचे दोन मुलं श्रेया आणि सोहम यांच्यासोबत नदीवर धुणे धुवायला गेले होतो. गावातील साठवण तलावावर तिघेही गेले होते. तलावावर इतर महिलाही धुणं धूत होत्या. तलावाच्या काठावर वैशाली यांची दोन्ही मुले खेळत होती. खेळता खेळता या मुलांचा पाय घसरला आणि दोन्ही मुलं पाण्यात पडली. पाणी खोल असल्याने अंदाज आला नाही. त्यामुळे मुलं बुडायला लागली. हे पाहून त्यांना वाचवण्यासाठी वैशालीनेही तलवात उडी घेतली. पण तिलाही पोहता येत नव्हते. त्यामुळे तिही पाण्याच्या विळख्यात सापडली. तिघांनीही वाचवण्यासाठी किंकाळ्या फोडल्या, वाचवा वाचवा म्हणून जोर जोरात हाका मारल्या. पण त्यांच्या मदतीला कोणीही धावून आलं नाही. अखेर तिघांनाही जलसमाधी मिळाली.

 

हे सुद्धा वाचा

मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांची मध्यरात्री मुख्यमंत्र्यांसोबत वर्षावर भेट, मोठा राजकीय भूकंप होणार?

 

आई सापडली, पोरं कुठाय?

या घटनेची माहिती गावात आणि आजूबाजूच्या गावात वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा प्रशासनालाही त्याची माहिती दिली. पोलीसही घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी पाण्यात शोधाशोध करून वैशाली हिचा मृतदेह बाहेर काढला. पण श्रेया आणि सोहम यांचा मृतदेह अद्याप सापडला नाही. दोघांचाही मृतदेह शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने खडकी गावावर शोककळा पसरली आहे.

घोडके कुटुंबावर काळाचा घाला

एकाच कुटुंबातील तिघे गेल्याने गावावर शोककळा पसरली आहे. घोडके कुटुंब तर हवालदिल झालं आहे. गरीब कुटुंबातील तीन तीन जणांचा मृत्यू झाल्याने घोडके कुटुंब हवालदिल झालं आहे. अनपेक्षितपणे झालेल्या या घटनेमुळे कुटुंबातील लोक खचून गेले आहेत. मुलांचा मृतदेह हाती लागावा म्हणून घोडके कुटुंबीय टाहो फोडत आहेत.

मृतांची नावे

वैशाली अनिल घोडके (वय 35)

श्रेया अनिल घोडके (वय 12)

आणि सोहम अनिल घोडके (वय 10)

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now