टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

ज्याचा विचारही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला नाही तेच इराणने केले, थेट मोठा निर्णय, पाकिस्तानमध्ये..

On: April 25, 2026 11:01 AM
Follow Us:

Iran US Talks : इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तानची लुडबुड वाढली आहे. काय म्हणे तर पाकिस्तानला या युद्धात मध्यस्थी करायची आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इराणमधून अमेरिका असे पाकिस्तानचे शिष्टमंडळ फिरत आहे, मात्र त्यांना काही यश मिळत नाहीये.

ज्याचा विचारही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला नाही तेच इराणने केले, थेट मोठा निर्णय, पाकिस्तानमध्ये..

इराण आणि अमेरिका युद्ध खतरनाक स्थितीत आहे. होर्मुज खाडीत वाट लागली आहे. पूर्ण होर्मुज खाडी ठप्प असल्याने जग संकटात आहे. एलपीजीचे संकट डोक्यावर आहे. एका महिन्यापेक्षा अधिक काळापासून हा संषर्घ सुरू आहे. होर्मुजमध्ये जहाज जप्त केली जात आहेत. तणाव वाढला आहे. मध्यस्थी करणाऱ्या देशांनाही फार काही यश मिळत नाहीये. आता नुकताच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची पाकिस्तान दाैऱ्यावर पोहोचले आहेत. पाकिस्तानमध्ये इराण आणि अमेरिका युद्धाची बैठक होती. मंगळवारी असलेल्या या बैठकीला इराणने येण्यास नकार दिला. त्यानंतर आता इराणचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानमध्ये पोहोचले आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका बजावत आहे. मात्र, पाकिस्तानला काही यश मिळत नाहीये. या दाैऱ्यादरम्यान इराणने अत्यंत मोठी अट ठेवली आहे.

एक्सवर सोशल मीडिया पोस्ट शेअर करत इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी लिहिले, आम्ही पाकिस्तान दाैऱ्यासाठी इस्लामाबाद येथे पोहोचलो आहोत. अमेरिकेने जे युद्ध लादले आहे ते संपवण्यासाठी आणि आपल्या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या या मध्यस्थी आणि सदिच्छा प्रयत्नांचा एक भाग म्हणून परराष्ट्र मंत्री अराघची पाकिस्तान येथे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी भेट घेतील.

यादरम्यान त्यांनी पुढे म्हटले की, इराण आणि अमेरिका यांच्यात कोणत्याही प्रकारची बैठक किंवा चर्चा होणार नाही. इराणचे म्हणणे पाकिस्तानला कळवले जाईल. थोडक्यात काय तर आता इराण अमेरिकेसोबत थेटपणे चर्चा करणार नाहीये. हा अमेरिकेला मोठा दणका आहे. यापूर्वी इराण आणि अमेरिकेने समोरासमोर बसून चर्चा केली. मात्र, त्यानंतर अमेरिकेने असे काही पाऊले उचलली, ज्यानंतर इराणने बैठकी नकार दिला.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी ट्विटरवर त्यांच्या आगमनाची घोषणा केली. फील्ड मार्शल आसिम मुनीर, गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्यासोबत इराणी शिष्टमंडळाचे स्वागत करताना दिसत आहेत. अचानक इराणचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तान दाैऱ्यावर आल्याचे बघायला मिळत आहे. दुसरीकडून अमेरिकेने दावा केला की, इराण नवीन युद्धबंदी प्रस्ताव तयार करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now