टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

थेट गोळ्या घाला, जहाजाचे तुकडे करा, ट्रम्प यांच्या आदेशाने जगात मोठी खळबळ, होर्मुझमध्ये भयंकर युद्धाला सुरुवात?

Follow Us:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या लष्कराला मोठा आणि हादरवून टाकणारा आदेश दिला आहे. या आदेशामुळे इराण नेमकं काय करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जगाचे होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे लक्ष लागले आहे.

America Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध अजूनही संपलेले नाही. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी चर्चेची पहिली बैठक झाली आहे. दोन्ही देशांकडून चर्चेच्या दुसऱ्या फेरीचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु इराणचा अण्वस्त्र निर्मितीच्या कार्यक्रमावर दोन्ही देशांचे एकमत होत नसल्याने चर्चेची दुसरी फेरी रखडली आहे. असे असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला हादवरून टाकणारा आदेश दिला आहे. त्यांच्या या आदेशामुळे युद्धाचा मोठा भडका उडण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमका काय आदेश दिला आहे?

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सैनिकांना मोठा आदेश दिला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत आता एखादे जहाज नव्याने भूसुरंग (माईन्स) पेरताना आढळल्यास ते जहाज थेट उडवून टाकावे, असा थेट आणि स्पष्ट आदेशच ट्रम्प यांनी दिला आहे. विशेष म्हणजे माईन्स पेरताना एखादे जहाज दिसल्यावर कोणाचाही परवानगी घेण्याची गरज नाही. कोणताही उशीर करू नये. संबंधित जहाज थेट उडवून टाकावे, असेही ट्रम्प म्हणाले आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून इराणने आक्रमक पवित्रा धारण केलेला असतानाच ट्रम्प यांनी हा आदेश दिला आहे.

युद्ध आणखी भडकणार का?

अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धसमाप्तीवर एकमत न झाल्याने या दोन्ही देशांमध्ये वाद दिवसेंदिवस भडकत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील आमची नाकेबंदी चालूच राहील, असा पवित्रा ट्रम्प यांनी घेतल्याने आम्हीदेखील होर्मुझची सामुद्रधुनी बंद करू अशी भूमिका इराणने घेतलेली आहे. अजूनही ही सामुद्रधुनी बंदच आहे. असे असताना आता ट्रम्प यांनी थेट जहाज उडवण्याचा आदेश दिल्याने जगात खळबळ उडाली आहे.

ट्रम्प यांचा इशारा नेमका कोणाला?

हा आदेश देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतलेले नाही. परंतु ट्रम्प यांचा हा आदेश इराणविरोधात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता इराण नेमकी काय भूमिका घेणार? याकडे जगाचे लक्ष लागले आहे. याआधीही इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत शेकडो माईन्स पेरलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

ट्रम्प यांनी गरळ ओकली! पण अमेरिकेच्या या नेत्याने जिंकलं मन, म्हणाला, मी राष्ट्रपती बनलो तर भारतासोबत…

एका क्षणात भारतात सर्वकाही ठप्प होईल, जगावर मोठं संकट, इराणने प्रसिद्ध केलेल्या नकाशाने जगात खळबळ…

अमेरिकेकडून युद्धात अत्यंत मोठी घोषणा, जगात खळबळ, थेट होर्मुज खाडीत इराणचे..

Rohit Pawar and Jay Pawar: बारामतीत 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते, जय पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची सूचक प्रतिक्रिया

Petrol Diesel Prices: सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार भार, पेट्रोल-डिझेल थेट २८ रुपयांनी महागणार?

इतिहासाचा अपमान का? ‘राजा शिवाजी’मधील वाघ नखांच्या सीनवरून टीका; अखेर रितेशनेच दिलं उत्तर