टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Rohit Pawar and Jay Pawar: बारामतीत 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते, जय पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची सूचक प्रतिक्रिया

On: April 23, 2026 10:36 AM
Follow Us:

Rohit Pawar and Jay Pawar on Baramati: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार आणि रोहित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Rohit Pawar and Jay Pawar on Baramati: बारामती पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान सुरु असताना 2029 च्या निवडणुकीविषयी आमदार रोहित पवार यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. जय पवार (Jay Pawar) यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना, २०२९ मध्ये मी उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. पण मला कार्यकर्ता म्हणून काम करायचे असल्याचे वक्तव्य केले. यावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी रोहित पवार यांनी म्हटले की, कार्यकर्ते आणि पक्षाची इच्छा असते, ते ऐकावं लागतं. त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय घेतला जाईल त्यावेळी सुनेत्रा काकी (Sunetra Pawar) निवडणुकीला उभं राहणार नसतील तर,  जे कोणी उभं राहील, 2029 ला तशी बघितली तर सर्वपक्षीय लढाई होऊ शकते, असे रोहित पवार यांनी सांगितले. (Maharashtra Politics news)

अजितदादांच्यावेळी पवार विरुद्ध पवार झालं आहे, लोकसभेलाही पवार विरुद्ध पवार झालेलेच आहे. उद्या पुढे जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. लोकांची इच्छा आहे, लोकांचं मत आहे, जी शेवटची दादांची इच्छा होती, पवार परिवार एकत्र आला पाहिजे. हे कितीही खरं असलं तरी राजकीय दृष्टीकोनातून चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात,काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. उद्या जाऊन परिवाराला एकत्र यायचं झालं तर आम्ही विरोधात आहोत. पण सत्तेतून काही लोकांना पक्षाला बाहेर येणे, आमदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विचार करता तो तसा सोपा निर्णय नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले.

पक्ष वेगळे राहतीलच. कारण आम्ही विरोधी पक्षात आहोत. 2029 च्या बारामतीच्या विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार होऊ शकतं. जयच्या विरोधात युगेंद्र उमेदवार असू शकतो. पवार विरुद्ध पवार लोकसभेला झालंय, विधानसभेला झालंय आणि 2029 ला देखील होऊ शकतं. पवार विरुद्ध पवार व्हावं ही लोकांची इच्छा नाही. मात्र, जे पवारांकडे चांगल्यादृष्टीने बघत नाही, पवारांचं वलय संपवावं अशी काही राजकारण्यांची इच्छा आहे. काही जण पवार विरुद्ध पवार व्हावं यासाठी काम करत आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now