टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

विजयदादा मुख्यमंत्र्याच्या भेटीला, मंत्री विखे पाटील पडले पाया, रणजितसिंहंना पुन्हा विधानपरिषद मिळणार का?  

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात दाखल झाले होते. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या पाया पडले.

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी दिसत आहे. इच्छुकांनी गाठीभेटी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात दाखल झाले होते. विजयसिंह मोहिते पाटील हे त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते यांची पुन्हा विधान परिषदेवर वर्णी लागावी, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आल्याची चर्चा सुरु आहे. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पाया पडल्याचं पाहायला मिळालं.

आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील देखील होते. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पाया पडल्याचं पाहायला मिळालं. विजयसिंह मोहिते पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते. यावेळी, विखे पाटील मंत्रालयात दाखल असताना दोघांचीही भेट झाली. विजयसिंह मोहिते पाटील हे रणजीतसिंह मोहिते यांना पुन्हा विधान परिषदेवर वर्णी लागावी यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आल्याची चर्चा आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांची टर्म येत्या 13 मे रोजी संपत आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर प्रहार

Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम

Maharashtra Rain Konkan: पहिल्याचं पावसात घटप्रभा नदीचं रौद्ररुप; सावंतवाडीमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, PHOTO

मान्सून लांबला… १५ जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी, हवामान खात्याची मोठी माहिती