टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

भोंदू बाबा अशोक खरातची प्रकृती बिघडली, तातडीने मागवली कार्डियाक ॲम्बुलन्स, नेमकं काय घडतंय?

Follow Us:

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातची एसआयटी चौकशीदरम्यान प्रकृती बिघडली असून दुसरीकडे एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची ६ तास कसून चौकशी करण्यात आली आहे.

भोंदू बाबा अशोक खरातची प्रकृती बिघडली, तातडीने मागवली कार्डियाक ॲम्बुलन्स, नेमकं काय घडतंय?

नाशिकमधील बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच आता अशोक खरातच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची मोठी अपडेट समोर येत आहे. विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी सुरू असताना अशोक खरातची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे पोलीस प्रशासनाची एकच धावपळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून अशोक खरातला तातडीने कार्डियाक ॲम्बुलन्स मागवून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीकडून अशोक खरातची सखोल चौकशी सुरू असताना अचानक त्याला मळमळ, उलट्या आणि तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. याच वेळी अशोक खरातने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने कार्डियाक ॲम्बुलन्स बोलवण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला काही काळ ऑक्सिजनवरही ठेवण्यात आले होते.

यावेळी डॉक्टरांच्या पथकाने त्याची प्राथमिक तपासणी केली. यानंतर आता अशोक खरातच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच त्याच्या वकिलांनी अशोक खरातला न्यूरोलॉजिकल समस्या असल्याने न्यूरोसर्जनकडे नेण्याची मागणी न्यायालयात केली होती. यानंतर अचानक त्याची प्रकृती खालवली आहे.

बड्या हॉटेल व्यावसायिकाची ६ तास चौकशी; आर्थिक हितसंबंध रडारवर

या प्रकरणाचा तपास करत असताना एसआयटीने आपला मोर्चा आता खरातशी संबंधित असलेल्या बड्या व्यक्तींकडे वळवला आहे. शहरातील एका नामांकित हॉटेल व्यावसायिकाला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. तब्बल ६ तास चाललेल्या या चौकशीत खरात आणि व्यावसायिकांमधील आर्थिक हितसंबंध, संशयास्पद जमीन व्यवहार आणि मोठ्या रकमांची देवाणघेवाण यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या प्रक्रियेनंतर संबंधित व्यावसायिकाला सोडण्यात आले असले, तरी यातून मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

पुन्हा न्यायालयात हजर करणार

दरम्यान अशोक खरातची पोलीस कोठडी उद्या संपत आहे. त्यामुळे कोठडीची मुदत संपण्यापूर्वी महत्त्वाचे पुरावे आणि माहिती गोळा करण्यासाठी एसआयटीकडून तपासाचा धडाका सुरू आहे. उद्या खरातला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले जाणार असून, तपासाच्या व्याप्तीचा विचार करता पोलीस त्याची कोठडी वाढवून मिळण्याची मागणी करण्याची दाट शक्यता आहे. खरातवर फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराचा तपास आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

जगाची उडाली झोप, थेट जहाजावर गोळीबार करत.. होर्मुज हाहाकाराला सुरूवात

जमिनीची NA नोंद एका क्लिकवर; राज्य सरकारचा दमदार निर्णय, असा होणार मोठा फायदा

कधीही हाहाकार होऊ शकतो.. अमेरिकेची शस्त्रसंधी नव्हे तर.. इराणच्या दाव्याने खळबळ, थेट..

Pune Bus Accident CCTV : अचानक ब्रेक फेल, भरधाव बस लग्नपत्रिकेच्या दुकानात शिरली; पुण्यात भीषण अपघात

Gokul Election: गोकुळमध्ये भाजप सोडून मित्रपक्षाच्या पॅनेलसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्या, राष्ट्रवादीची मुश्रीफांकडे मागणी; भाजप, शिवसेना सोडून आणि कोणी मित्र आहेत का? भाजपचा खोचक सवाल!

US-Iran ceasefire : ‘हरलेल्यांंनी अटी घालायच्या नसतात..’ युद्धविरामादरम्यान हल्लाबोल, मोठ्या ऑफरला मारली लाथ