टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

विलासराव देशमुखांबद्दल संजूबाबाने असं काही म्हटलं..; ऐकून रितेश देशमुखला अश्रू अनावर, जिनिलियाही भावूक

On: April 21, 2026 11:18 AM
Follow Us:

‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात रितेश देशमुख आणि जिनिलिया यांना अश्रू अनावर झाले. कार्यक्रमात रितेश सर्वांना संजय दत्तच्या भेटीचा किस्सा सांगत होता. या भेटीदरम्यान संजूबाबाने विलासराव देशमुखांची आठवण काढली. त्याबद्दल सांगताना रितेशचे डोळे पाणावले.

विलासराव देशमुखांबद्दल संजूबाबाने असं काही म्हटलं..; ऐकून रितेश देशमुखला अश्रू अनावर, जिनिलियाही भावूक

अभिनेता रितेश देशमुखने ज्या चित्रपटाचं स्वप्न गेल्या दहा-बारा वर्षांपासून पाहिलं होतं, तो अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित झाला. या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात असं काही घडलं, ज्यामुळे तिथे उपस्थित सर्वजण भावूक झाले. रितेशने या चित्रपटासाठी जी मेहनत घेतली, ती सर्वांत जवळून त्याची पत्नी जिनिलियाने पाहिली. याच कारणामुळे ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात तिचे डोळे पाणावले होते. तर दिवंगत वडील विलासराव देशमुख यांची आठवण काढत रितेशच्याही डोळ्यात अश्रू तरळले होते. या चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि निर्मिती प्रक्रियेत त्याला किती अडचणींचा सामना करावा लागला, याविषयी रितेशने सांगितलं.

‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेशनेच केलं असून यामध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा जिनिलियाने सांभाळली. सोमवारी 20 एप्रिल रोजी मुंबईत या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला रितेश आणि जिनिलियासोबतच भाग्यश्री, विद्या बालन, महेश मांजरेकर, संजय दत्त, अभिषेक बच्चन आणि इतरही अनेक कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमात रितेशने एक खास किस्सा सांगितला. चित्रपटातील भूमिकेसाठी जेव्हा त्याने संजय दत्तची भेट घेतली, तेव्हा संजूबाबाने विलासराव देशमुखांचा उल्लेख केला होता. संजयने रितेशला म्हटलं की, “हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. कारण माझ्या वडिलांचं तुझ्या वडिलांशी खूप चांगलं नातं होतं. आपले वडील एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे ओळखत होते. त्यामुळे हा चित्रपट त्यांच्यासाठी बनव.” हीच गोष्ट सांगताना रितेशला अश्रू अनावर झाले.

 

यावेळी संजय दत्तनेही प्रतिक्रिया दिली. “हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. रितेश माझ्या छोट्या भावासारखा आहे. मी खुश आहे, कारण आमच्या वडिलांच्या काळापासूनच आमचे कुटुंबीय एकमेकांशी जोडलेले आहेत. या चित्रपटात रितेशसोबत काम करून मला खूप चांगलं वाटलं.” तर दुसरीकडे सोशल मीडियावर जिनिलियाचाही रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रितेशने तिचं कौतुक करत म्हटलं की, जिनिलिया फक्त या चित्रपटाची निर्माती नाही, तर ती माझा सर्वांत मोठा आधार आणि आत्मविश्वास आहे. पतीच्या तोंडून हे शब्द ऐकून जिनिलियाचे डोळे पाणावले होते.

राजा शिवाजी हा चित्रपट येत्या 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, बोमन इराणी, फरदीन खान, सिद्धार्थ जाधव, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री अशी कलाकारांची मोठी फौजच आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Horoscope Today 22nd August 2026 : आज ग्रहांची चाल बदलणार चित्र ! मेष ते मीन जाणून घ्या राशिभविष्य

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती

एका आयफोनमुळे गेला तिघांचा जीव, छत्रपती संभाजीनगरमध्ये डोंगरावरून पडून आई वडील अन् मुलाचा मृत्यू

Plane crash : विमानाचा भीषण अपघात, लँडिगच्या तयारीमध्ये असताना थेट खाली कोसळलं, सर्व प्रवाशांचा मृत्यू

आश्रमशाळेतील तीन विद्यार्थींनीचा मृत्यू, महाराष्ट्रातील हादरवून सोडणारी घटना

महायुतीत पुन्हा धुसफूस ? शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळेच आज भाजप सत्तेत, त्या पोस्टने सगळंच बाहेर आलं