टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

अखेर जगाला ज्याची भीती तेच घडलं, इराणमध्ये सत्तापालट? लष्कराने थेट…

एकीकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा चर्चा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता इराणमधून धक्कादायक घटना समोर आली आहे.

अखेर जगाला ज्याची भीती तेच घडलं, इराणमध्ये सत्तापालट? लष्कराने थेट...होर्मुझ बंदच राहणार?

Iran America War : अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदी केल्यानंतर इराणने पुन्हा एकदा ही सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष नव्या वळणावर पोहोचला आहे. दोन्ही देशांतील हा संघर्ष मिटवण्यासाठी पाकिस्तानातील अहमदाबादमध्ये चर्चेची दुसरी फेरी आयोजित करण्यात आली आहे. परंतु या बैठकीचे भवितव्य अधांतरीच आहे. इराणने यावेळी होर्मुझच्या सामुद्रधुनीत आक्रमक पवित्रा धारण केलेला असतानाच आता इराणमधून जगाला हादरवून टाकणारी एक माहिती समोर आली आहे.

इराणमध्ये सत्ता आता लष्कराच्या हाती?

इराणची सत्ता आता कट्टरंपती इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात आयआरजीसीच्या हाती आल्याचा दावा केला जातोय. ‘द न्यूयॉर्क पोस्ट’मध्ये याबाबत तसे वृत्त दिले आहे. आता इराणमध्ये सर्व महत्त्वाचे निर्णय IRGC कडून घेतले जात आहेत, असे या वृत्तात सांगण्यात आले आहे. गेल्या आठवड्याभरात हा बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बदलाअंतर्गत IRGC चे कमांडर अहमद वाहिदी आणि त्यांचे जवळचे सहकारीच आता देशाचे प्रमुख नेतृत्त्व म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. एकीकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा होत असतानाच ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता होर्मुझची सामुद्रधुनी भविष्यातही बंदच ठेवली जाणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

परराष्ट्रमंत्र्यांना केले बाजूला?

वॉशिंग्टन येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ द स्टडी ऑफर वॉर’च्या मतानुसार IRGC ने इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांना बाजूला केले आहे. तसेच वरिष्ठ पातळीवर घेतले जाणारे सर्व निर्णय आता IRGC कडून घेतले जात आहेत. अमेरिकेसोबतच्या पहिल्या बैठकीनंतर अराघची यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खोलण्याची घोषणा केली होती. परंतु हा निर्णय बदलून अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी होर्मुझ बंदच असणे गरजेचे आहे, अशी भूमिका IRGC कडून घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आता इराणमध्ये IRGC कडून सर्व महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याचा दावा केला जात असताना अमेरिका-इराण यांच्यातील चर्चेच्या दुसऱ्या फेरीत नेमकं काय होणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पायाखालची जमीन सरकली, UAE मध्ये धक्कादायक मागणी; इराणचा मोठा विजय?

Tushar Doshi : मोठी बातमी : साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड

US Iran War : ज्याची भीती होती तेच घडलं, अखेर चीनची एन्ट्री, अमेरिकेनं इराणच जहाज जप्त करताच थेट…, मोठी खळबळ

मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या गळाला? मुख्यमंत्री फडणवीस फिरवणार सुदर्शन चक्र

देवेंद्र फडणवीस यांचे चॅलेंज सुप्रिया सुळे यांनी स्वीकारले, थेट म्हटले, मी तयार..

Devendra Fadnavis on Womens Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस