टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

IPL 2026 Points Table: चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?

Follow Us:

IPL 2026 Points Table Update: चेन्नईवर 10 धावांनी मात करत हैदराबादची मोठी झेप; पाहा पॉइंट्स टेबलमध्ये कोणता संघ कोणत्या स्थानावर?

IPL 2026 Points Table Update After SRH vs CSK: आयपीएल 2026 चा 27 वा सामना शनिवारी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात पार पडला. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या या अटीतटीच्या लढतीत हैदराबादने चेन्नईवर 10 धावांनी मात केली. या विजयामुळे हैदराबादने गुणतालिकेत मोठी झेप घेतली असून चेन्नईच्या अडचणीत भर पडली आहे.

SRH vs CSK: हैदराबादची टॉप-4 मध्ये एन्ट्री

चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर हैदराबादने सहाव्या क्रमांकावरून थेट चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आता हैदराबादच्या खात्यात 6 गुण असून त्यांचा नेट रनरेट +0.566 इतका झाला आहे. दुसरीकडे, पराभूत झालेला चेन्नई सुपर किंग्स संघ सातव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. चेन्नईने 6 पैकी केवळ 2 सामने जिंकले असून 4 गुणांसह त्यांचा नेट रनरेट -0.780 आहे.

Kolkata Knight Riders: कोलकाता नाईट रायडर्सवर बाहेर पडण्याची टांगती तलवार

प्ले-ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी कोणत्याही संघाला किमान 8 सामने जिंकणे आवश्यक असते. मात्र, कोलकाता नाईट रायडर्सची अवस्था बिकट झाली आहे. केकेआरने आतापर्यंत 6 सामने खेळले असून 5 सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे, तर 1 सामना अनिर्णित राहिला. केकेआरच्या खात्यात केवळ 1 गुण आहे. उर्वरित सर्व 8 सामने जिंकले तरच केकेआरला प्ले-ऑफची संधी मिळेल, जे सध्या तरी कठीण दिसत आहे.

IPL 2026 Points Table: आयपीएल पॉईंट्स टेबल

क्रमांक संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रन रेट
पंजाब किंग्स +१.०६७
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू +१.१७१
राजस्थान रॉयल्स +०.८८९
सनरायझर्स हैदराबाद +०.५६६
दिल्ली कॅपिटल्स +०.३१०
गुजरात टायटन्स +०.०१८
चेन्नई सुपर किंग्स -०.७८०
लखनऊ सुपर जायंट्स -०.८०४
मुंबई इंडियन्स -१.०७६
१० कोलकाता नाईट रायडर्स -१.१४९

 

आणखी वाचा 

Todays Gold Rate: अक्षय तृतीयेच्या दिवशी आनंदाची बातमी! सोने उच्चांकापेक्षा स्वस्त, 10 ग्रॅमसाठी…

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now