टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

होर्मुज खाडीत भारतीय जहाजासोबत खळबळ उडवणारा प्रकार, थेट ऑडिओ पुढे, कॅप्टनने..

On: April 19, 2026 10:34 AM
Follow Us:

इराण आणि अमेरिका युद्धात युद्धबंदी दोन आठवड्यांकरिता जाहीर करण्यात आली. मात्र, स्थिती अजूनही गंभीर होत आहे. होर्मुज खाडीत तणाव वाढला आहे. होर्मुज खाडीत भारतीय जहाजावर गोळीबार करण्यात आला. आता मोठी माहिती पुढे येत आहे.

होर्मुज खाडीत भारतीय जहाजासोबत खळबळ उडवणारा प्रकार, थेट ऑडिओ पुढे, कॅप्टनने..

होर्मुज खाडीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भारतीय जहाजावर इराणकडून गोळीबार करण्यात आला. भारतानेही यानंतर कडक भूमिका घेतली. भारत युद्धात कोणाच्याही बाजूने नाहीये. मात्र, असे असतानाही भारतीय जहाजावर गोळीबार करण्यात आला. इराणच्या लष्कराने (आयआरजीसी) शनिवारी होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका भारतीय जहाजाला थांबवले आणि हेच नाही तर तात्काळ पुन्हा बंदरावर जाण्याचे आदेश दिले. एक ऑडिओ रिकॉर्डिंग यादरम्यानच्या संवादाचे रेकॉर्ड झाले. इराणच्या अधिकाऱ्याने भारतीय जहाजाच्या कॅप्टनला होर्मुज खाडी अजूनही बंद असल्याचे सांगितले. तुम्ही लवकरात बंदरावर परत जा. गो टू बॅक तात्काळ जा. यावर भारतीय जहाजाच्या कॅप्टनने म्हटले की, ठीक आहे.. तुमचा मेसेज मी रिपीट करतो ..

होर्मुज खाडी अजूनही बंद आहे.. ओके सर.. यावर इराणी अधिकारी म्हणतो की, जी सर.. त्यानंतर काही वेळात जहाजाने आपला मार्ग बदलला. या संवादापूर्वी इराणने भारतीय झेंडा असलेल्या जहाजावर गोळीबार केला. हे जहाज इराणी तेल घेऊन भारतात जात होते. या गोळीबाराच्या घटनेनंतर भारताच्या सरकारने मोठी चिंता व्यक्त केली. हेच नाही तर इराणी राजदूतसोबत भारताने चर्चा केली. भारताचा झेंडा असलेल्या जहाजावर गोळीबार करण्यात आल्याने भारतात तणाव आहे.

त्यामध्येच भारताने तातडीने पाऊले उचलले. होर्मुज खाडीत भारतीय जहाजाला अडवले जात आहेत. गेल्या एक महिन्यापासून जहाज होर्मुजजवळ आहेत. त्यामध्येच भारतीय जहाजावर करण्यात आलेल्या गोळीबारानंतर तणाव वाढला आहे. भारतात एलपीजीचे संकट आहे. होर्मुज खाडी खुली करण्यात आल्यानंतर जगाने सुटकेचा श्वास घेतला. पण स्थिती अजूनही गंभीर असल्याचे दिसत आहे. इराणकडून या गोळीबारानंतर स्पष्टीकरण देण्यात आले.

पाकिस्तानमध्ये इराण आणि अमेरिकेची बैठक आहे. या बैठकीतून मार्ग निघण्याची शक्यता आहे. जर मार्ग निघाला नाही तर इराणवर मोठा हल्ला अमेरिका करू शकते. अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्यानंतर इराण माघार घेण्याची शक्यता आहे. जर इराणने युद्धात माघार घेतली नाही आणि करार झाले नाहीत तर परिस्थिती चिघळे, याचे परिणाम जगाला भोगावे लागतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now