टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

टी-20 विश्वचषकातून 3 संघ OUT; टीम इंडियासह 2 संघांची सुपर-8 मध्ये दिमाखदार एन्ट्री, 6 जागेसाठी 15 टीम शर्यतीत

Follow Us:

T20 World Cup 2026 Points Table after IND vs PAK : भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत 27 लीग सामने पूर्ण झाले आहेत.

T20 World Cup 2026 Points Table after IND vs PAK : भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक (ICC Men’s T20 World Cup) स्पर्धेत आतापर्यंत 27 लीग सामने पूर्ण झाले आहेत. 27वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगला होता. या टप्प्यापर्यंत तीन संघ स्पर्धेबाहेर गेले असून दोन संघांनी सुपर 8 मध्ये अधिकृत प्रवेश मिळवला आहे.

भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत सुपर 8 चे तिकीट निश्चित केले. त्याचबरोबर दोन वेळा विजेतेपद पटकावलेल्या वेस्ट इंडिजनेही सुपर 8 मध्ये स्थान मिळवले आहे. दुसरीकडे ओमान, नेपाळ आणि नामिबिया हे तीन संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. ग्रुप डी मधून अद्याप कोणताही संघ अधिकृतरीत्या पात्र किंवा अपात्र ठरलेला नाही.

 ग्रुप A गुणतालिका (Group A T20 World Cup 2026 Points Table)

ग्रुप A मध्ये भारताने पहिले तीन सामने जिंकत 6 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आणि सुपर 8 मध्ये प्रवेश निश्चित केला. दुसऱ्या स्थानावर यूएसए आहे (4 पैकी 2 विजय). तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे (3 पैकी 2 विजय). नेदरलँड्सने 3 पैकी 1 सामना जिंकला असून ते चौथ्या स्थानावर आहेत. नामिबियाने पहिले तीनही सामने गमावले असून ते स्पर्धेतून बाद झाले आहेत.

संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
भारत 3 3 0 0 6 3.05
अमेरिका 4 2 2 0 4 0.787
पाकिस्तान 3 2 1 0 4 -0.403
नेदरलँड्स 3 1 2 0 0 -1.352
नामिबिया 3 0 3 0 0 -2.224

 ग्रुप B गुणतालिका (Group B T20 World Cup 2026 Points Table)

ग्रुप B मध्ये श्रीलंका दोन विजयांसह पहिल्या क्रमांकावर आहे. झिम्बाब्वेनेही पहिले दोन सामने जिंकून दुसरे स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलिया 2 पैकी 1 विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे. आयर्लंड 3 पैकी 1 विजयासह चौथ्या स्थानी आहे. ओमानने तीनही सामने गमावले असून ते स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
श्रीलंका 2 2 0 0 4 3.125
झिम्बाब्वे 2 2 0 0 4 1.98
ऑस्ट्रेलिया 2 1 1 0 2 1.1
आयरलँड 3 0 2 0 0 0.15
ओमान 3 0 2 0 0 -4.306

 ग्रुप C गुणतालिका (Group C T20 World Cup 2026 Points Table)

ग्रुप C मध्ये वेस्ट इंडिजने पहिले तीन सामने जिंकून अव्वल स्थान मिळवले आणि सुपर 8 मध्ये प्रवेश निश्चित केला. इंग्लंड 3 पैकी 2 विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्कॉटलंड 3 पैकी 1 विजयासह तिसऱ्या स्थानी आहे. इटली 2 पैकी 1 विजयासह चौथ्या क्रमांकावर आहे. नेपाळने तीनही सामने गमावले असून त्यांचा प्रवास संपला आहे.

संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
वेस्ट इंडिज 3 3 0 0 6 1.82
इंग्लंड 3 2 1 0 4 -0.143
स्कॉटलंड 3 1 2 0 2 0.359
इटली 2 1 1 0 2 -0.352
नेपाळ 3 0 3 0 0 -1.942

ग्रुप D गुणतालिका (Group D T20 World Cup 2026 Points Table)

ग्रुप D मध्ये दक्षिण आफ्रिका 3 विजय आणि 6 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. मात्र, अजून पात्रता अधिकृतरीत्या निश्चित झालेली नाही, कारण इतर दोन संघही 6 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. तरी नेट रनरेटच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचे सुपर 8 मध्ये स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. न्यूझीलंड 3 पैकी 2 विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यूएईने 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. अफगाणिस्तान आणि कॅनडा यांनी प्रत्येकी दोन सामने गमावले असून ते अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
दक्षिण आफ्रिका 3 3 0 0 6 1.477
न्यूझीलंड 3 2 1 0 4 1.919
UAE 2 1 1 0 0 -1.03
अफगाणिस्तान 2 0 2 0 0 -0.555
कॅनडा 2 0 2 0 0 -1.526

हे ही वाचा –

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

वैभव सूर्यवंशी याच्यासोबत श्रीलंकेच्या खेळाडूने केले नीच कृत्य, धक्कादायक प्रकार, थेट घरी जा..

Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक

Vaibhav Sooryavanshi : श्रीलंकेविरुद्ध जे जमलं नाही ते वैभवने अफगाणिस्तान विरुद्ध करुन दाखवलं, मोठी इनिंग खेळू शकला नाही, पण..

IND vs AFG : केएल-शुबमनचं कडक शतक, टीम इंडियाच्या पहिल्या दिवशी अफगाणिस्तान विरुद्ध 368 धावा

Team India T20I Squads : BCCI कडून आयर्लंड अन् इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; श्रेयस अय्यर कर्णधार, तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी

Vaibhav Sooryavanshi : हात जोडतो, लांब राहा…; श्रीलंकेत पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीचा पारा चढला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO