सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये जात, रहिवास, उत्पन्न असे विविध शासकीय दाखले मिळवण्यासाठी 10 शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ही शिबिरे 17 जून, 19 जून, 20 जून, 23 जून, 24 जून, 25 जून या दिवशी होणार असल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली. महसूल विभागाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत हा उपक्रम सुरु केला आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून प्रवेश, शिष्यवृत्ती, नोकरी यांसाठी विविध दाखल्यांची मागणी विद्यार्थ्यांकडूशन वाढत आहे. दरवर्षी दाखल्यांसाठी होणारी गर्दी व वेळेवर दाखले न मिळाल्याने विद्यार्थ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी ही शिबिरे घेतली जाणार आहे.
दि.17 जून रोजी ग्रामपंचायत वर्कशेड शिवणे, 19 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालय घेरडी, विद्यामंदिर प्रशाला सांगोला आणि डॉ.भाई गणपतराव देशमुख सभागृह महुद बु. येथे होणार आहे. दि.20 जून रोजी मांजरी हायस्कूल मांजरी, विद्यामंदिर प्रशाला नाझरे येथे होणार आहे. दि.23 जून रोजी अंबिका मंदिर तलाठी कार्यालय जवळ सोनंद येथे होणार आहे. दि.24 जून रोजी वत्सलादेवी देसाई विद्यालय, जवळा येथे होणार आहे. दि.25 जून रोजी श्रीराम विद्यालय हातिद आणि ग्रामपंचायत कार्यालय कोळा येथे सदर शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी सदर शिबिरांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार संतोष कणसे यांनी केले आहे.