अॅमेझॉनवर iPhone 16 Pro Max जबरदस्त डिस्काउंटसह विकला जात आहे. यात 6.9 इंचाचा LTPO Super Retina XDR OLED डिस्प्ले, 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि A18 Pro चिपसेटची ताकद देण्यात आली आहे.
Apple नं गेल्यावर्षी iPhone 16 Pro Max लाँच केला होता. आता अॅमेझॉनवर iPhone 16 Pro Max जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. ई-कॉमर्स साइटनं या हँडसेटच्या किंमतीत कपात केली आहे, तसेच बँक डिस्काउंट देखील मिळत आहे आणि एक्सचेंज ऑफरमुळे या मोबाईलची किंमत आणखी कमी होईल. चला जाणून घेऊया iPhone 16 Pro Max वर मिळणाऱ्या ऑफर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.
iPhone 16 Pro Max चा 256GB स्टोरेज व्हेरिएंट अॅमेझॉनवर 1,37,900 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे, जो गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये 1,44,900 रुपयांमध्ये लाँच झाला होता. बँक ऑफर पाहता ICICI Bank क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट केल्यास फ्लॅट 3000 रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळू शकतो, ज्यामुळे प्रभावी किंमत 1,34,900 रुपये होईल. लाँच प्राइसच्या तुलनेत या आयफोनवर एकूण 10 हजार रुपयांची बचत होऊ शकते.
iPhone 16 Pro Max चे फीचर्स
iPhone 16 Pro Max मध्ये 6.9-इंचाचा Super Retina XDR OLED डिस्प्ले मिळतो. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,000 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यावर सिरॅमिक शील्डची लेयर देण्यात आली आहे. प्रो मॅक्स मॉडेलमध्ये नवीन आणि सर्वात पावरफुल A18 Pro चिपसेट मिळतो, तसेच iOS 18 चा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये USB 3.0 Type-C पोर्टसह 27W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच MagSafe आणि Qi वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देखील आहे. हा फोन IP68 रेटेड आहेत.
या Pro आयफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 48-एमपीचा प्रायमरी कॅमेरा, 48-एमपीचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि 5x ऑप्टिकल झूम सपोर्टसह 12-एमपीची अल्ट्रा-वाइड-अँगल ‘टेट्राप्रिज्म’ पेरिस्कोप लेन्स मिळते. तर फ्रंटला 12-एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये अॅक्शन आणि कॅप्चर बटन आहे. ज्यामुळे कॅमेरा क्विक लाँच करता येतो. तसेच स्पर्श करताच कॅमेऱ्याची माहिती मिळते आणि स्लाइड करून सेटिंग बदलता येतात.
इतर महत्वाच्या बातम्या
KCC : किसान क्रेडिट कार्डच्या कर्जवाटपासंदर्भात मोठी अपडेट
Champions Trophy 2025 : एक मॅच रद्द झाल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी अजून रोमांचक, सेमीफायनलच गणित बदललं