हिंदू या शब्दाबाबत कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केलेल्या विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. हिंदू हा शब्द फारसी आहे. हिंदू शब्दाचा अर्थही अत्यंत गलिच्छ आहे, असे विधान जारकीहोळी यांनी केले आहे.
जारकीहोळी हे बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी परिसरात मानव बंधुता संस्थेच्या कार्यक्रमात बोलत असताना, त्यांनी हे विधान केले आहे. जारकीहोळी म्हणाले, हिंदू हा शब्द कसा आला यावर वाद व्हायला हवा. हिंदू हा शब्द फारसी भाषेतून आला आहे.
इराक, इराण, कझाकस्तान, याचा भारताशी काय संबंध? जर तुम्हाला हिंदू शब्दाचा अर्थ माहित झाला तर त्याची लाज वाटेल. हिंदू या शब्दाचा अर्थ अत्यंत घाणेरडा आहे. काही लोक या परकीय शब्दावर का आवाज करत आहेत, हे समजत नाही. हा परकीय शब्द आपल्यावर का लादला जातोय यावर चर्चा व्हायला हवी.
संबंधित बातम्या
सांगोला : भुयारी मार्ग दुरुस्तीच्या कामासाठी अखेर रेल्वे प्रशासनाकडून तूर्तास स्थगिती
सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक ; 40 मतदान केंद्रावर होणार मतदान होणार
हिवाळ्यात सकाळी खजूर खाल्ल्यामुळे नेमकं काय होईल जाणून घ्या….
मोठी खळबळ! ठाकरेंच्या मातोश्री परिसरात ड्रोनच्या अचानक घिरट्या, नेमकं प्रकरण काय?
राज्यात पावसाची शक्यता धूसर; तापमानात घट, काही दिवसात थंडी वाढणार, हवामान खात्याचा अंदाज




