संजय राऊतांनी राज ठाकरेंना कठोर शब्दांत सुनावले

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

काल जामिनावर सुटलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी अनेक गोष्टींवर भाष्य करतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कठोर शब्दांत सुनावले. तुरुंगातील काही अनुभव त्यांनी सांगितले. तुरुंगात असताना आठवणी खूप येतात, असं सांगून, राज यांनी एका जाहीर सभेत केलेल्या टीकेची आठवण सांगितली. 

  • आमचे मित्र राज ठाकरे यांनी एका सभेत बोलताना माझ्या अटकेचं भाकीत वर्तवलं होतं आणि राऊत यांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी, अशी टीका केली होती. मला त्यांना सांगायचंय की हो, मला ईडीनं अटक केली होती. ही अटक बेकायदेशीर होती. खुद्द न्यायालयानंच हे सांगितलंय. पण एखादा माणूस तुरुंगात जावा, अशा भावना शत्रूच्या संदर्भातही कधी व्यक्त करू नयेत, हे त्यांना सांगू इच्छितो, असं राऊत म्हणाले.
मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon