मोठी बातमी! आता काँग्रेसचे 22 आमदार फुटण्याच्या तयारीत

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter
राज्यातील सत्तासंघर्षात सुंदोपसुंदी सुरू असतानाच आता शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी मोठा गौप्यस्फोट केला. शिंदे-फडणवीस सरकार पडणार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवल्याचं सांगत चंद्रकांत खैरेंनी बार उडवून दिला.
खैरेंच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. राज्यातील शिंदे सरकारचा हा संघर्ष सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावर तारीख पे तारीख मिळत असतानाच चंद्रकांत खैरेंच्या दाव्यानं नव्याच वादाला फोडणी मिळाली आहे.
औरंगाबादेत शिवसेनेच्या बैठकीत बोलताना  खैरेंनी हे वक्तव्य केलंय. ते म्हणाले, निवडणुकीत मुस्लिम समाजाची बोनस मते शिवसेनेला मिळतात हा इतिहास आहे. मुस्लिमांची 20 टक्के मते पुन्हा एकदा शिवसेनेला मिळणार असून, ती आपली बोनस मत आहेत. तसेच शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र झाल्यानंतर हे सरकार कोसळेल. म्हणूनच उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवल्याचा दावाही करायला खैरे विसरले नाहीत.
मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon