मामाच्या गावाला जाऊया… एसटी कडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी जादा वाहतूक, रोज होणार ‘इतक्या’ फेऱ्या

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

उन्हाळ्याच्या सुट्टींचा विचार करता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) १५ एप्रिल ते १५ जून २०२५ पर्यंत ७६४ अतिरिक्त बसगाड्यांची सोय केली आहे. या जादा फेऱ्यांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. शालेय फेऱ्या रद्द करून लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना आगाऊ तिकिटे बुक करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू होत आहे. वर्षभरातील ही मोठी सुट्टी सुरू होताच लगेच लोकांची नातेवाईकांकडे, गावाला जाण्याची लगबग सुरू होते. लहान मुलांनीह मामाच्या नाहीत मावशीच्या, आजी-आजोबांकडे जाण्याची उत्सुकता असते आणि सुरू होते एकच घाई… हेच लक्षात ठेवून उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे जादा गाड्यांची वाहतूक करण्यात येणार आहे. यंदा देखील उन्हाळी जादा वाहतूकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या 764 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दिनांक 15 एप्रिल ते दिनांक १५ जूनपर्यंत एसटी मार्फत नियोजित फेऱ्या व्यतिरिक्त जादा वाहतूक केली जाते. स्थानिक पातळीवर शटल सेवा आणि जवळच्या फेऱ्या संबंधित आगारातून चालवल्या जातात. परंतु उन्हाळी सुट्टीमुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या बसेस ची मागणी वाढते. त्यासाठी या काळामध्ये शालेय फेऱ्या रद्द करून , त्या ऐवजी लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू केल्या जातात.

या दिवसापासून सुरू होणार जादा फेऱ्या

उन्हाळी हंगाम कालावधीत विभागांकडून प्रवाशी गर्दी हेाणाऱ्या मार्गावर दि.15 एप्रिल 2025 पासून जादा फेऱ्या टप्याटप्याने सुरु करण्यात येणार आहेत. उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयमार्फत राज्यातील विविध मार्गावरील 764 जादा फेऱ्यांना मंजूरी देण्यात आली असून, या जादा फेऱ्यांद्वारे दैनंदिन 521 नियतांद्वारे 2.50 लाख किमी चालविण्यात येणार आहे.

उन्हाळी जादा फेऱ्या संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी, प्रवाशांच्या सोयीसाठी रा.प.महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट www.msrtc.maharashtra.gov.in वर तसेच npublic.msrtcors.com या सकेतस्थळावर व मोबाईल ॲपव्दारे या बरोबरच रा.प.महामंडळाच्या बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रावर आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी प्रवाशांना उन्हाळ्याच्या सुट्टीतील प्रवासाचे नियोजन करून महामंडळाच्या मार्फत जादा वाहतूक सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रा.प.महामंडळाव्दारे करण्यात येत आहे.

हेही वाचा:

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon