ब्रेकिंग! विराट कोहलीशिवाय टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकू शकणार नाही

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter
  • भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने 4 विकेट ठेवून पाकिस्तानचा पराभव केला. विराट कोहलीच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारताने विजय मिळवला.
  • या विजयानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने एक अजब विधान केले. जर टीम इंडियाला वाटत असेल तरी विराट कोहलीशिवाय वर्ल्ड कप जिंकू शकतील, तर ते कदापि शक्य नाही”, असे विधान इंझमाम उल हकने केले आहे. हकच्या या विधानानंतर क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण आले आहे.
  • भारतीय संघाचा पाकिस्तान विरूद्धचा टी-20 विश्वचषकाच्या सलामीचा सामना अतिशय रोमांचक झाला. 160 धावांचे आव्हान भारतीय संघाने या सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. या सामन्यात माजी कर्णधार विराट कोहली याने नाबाद 82 धावांची खेळी केली.
  • जेव्हा विराट कोहली अप्रतिम फलंदाजी करतो तेव्हाच भारतीय संघ जिंकतो हे स्पष्टपणे सांगतो. अनेक लोक इतर फलंदाजांना दमदार फलंदाज म्हणतात. पण माझ्या मते भारतीय संघात फक्त विराट कोहली हाच जबरदस्त फलंदाज आहे.
  • जर भारताला विश्वचषक जिंकायचा असेल तर विराटने पहिल्या सामन्याप्रमाणे खेळणे गरजेचे आहे. तसेच, जर भारतीय संघाला वाटत असेल तरी विराट कोहलीशिवाय विश्वचषत जिंकता येईल, तर ते कदापि शक्य नाही, असे विधान हकने केले.
मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon