टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

ब्रेकिंग! मार्केट यार्ड ते शेळगी ब्रिज रस्त्यावर ट्रकने रिक्षाला ठोकले

Follow Us:
दरम्यान या अपघातात एका तेरा वर्षीय मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तिची अद्याप ओळख पटलेली नाही.
सोलापूर येथील मार्केट यार्ड ते शेळगी ब्रिज या रस्त्यावर एका ट्रकने रिक्षाला उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात महिला, पुरुष व लहान मुलांसह दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात रिक्षाचा अक्षरक्ष: चुराडा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असून प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपचारासाठी मदत करताना दिसत आहेत.
हा अपघात शुक्रवारी रिक्षा क्रमांक MH-13-AF-2209 असा आहे तर MH-43-BP-8788 असा ट्रकचा क्रमांक दिसत आहे. ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर रिक्षातील चार महिला, दोन पुरुष, चार लहान मुले हे गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना मदतीसाठी वेळेवर ॲम्बुलन्स न आल्याने जखमींना मिळेल त्या वाहनाने सिव्हील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.
काहीजण दुचाकीवर तर काहीजण रिक्षामध्ये जखमींना सिव्हीलमध्ये आणत असल्याचे चित्र पाहायला मिळालं. प्रहार संघटनेचे कार्यकर्ते जमीर शेख हे स्वतः या ठिकाणी जखमींवर उपचार होण्यासाठी सिव्हीलमध्ये ठाण मांडून असल्याचं दिसून येत आहे. हे सर्व अति गंभीर जखमी असून त्यांच्यावर तातडीने सिव्हिल हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत कोणत्याही जखमीची अद्याप ओळख पटलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

मोठी बातमी! भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, थेट रशियासोबत मिळून समुद्रात मोठा खेळ, अमेरिकेत उडाली खळबळ

फ्लॉवर की कोबी…कोणती भाजी आहे पौष्टिक? जाणून घ्या दोन्हींमधील पोषक तत्वे आणि आरोग्यदायी फायदे

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल