देश पुन्हा हादरला ; उत्तर प्रदेशात श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter
श्रद्धा वालकर हत्याकाडांमुळे देश हादरला आहे. या हत्याकांडासंबंधीत थरकाप उडवणारे नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता श्रद्धा हत्याकांडाची आता उत्तरप्रदेशात पुनरावृत्ती झाली आहे.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी प्रियकराने 6 तुकडे केले. ही ह्रदयद्रावक घटना आझमगढ भागात घडली आहे. आझमगढमध्ये काही दिवसांपूर्वी एका विहिरीत एक मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह अगदी छिन्नविछिन्न अवस्थेत होता, या मृतदेहाचे 5 ते 6 तुकडे करण्यात आले होते. यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस तपासासाठी त्याच्यासह घटनास्थळी गेले.
त्यावेळी आरोपीने लपवून ठेवलेल्या गावठी बंदूकीतून पोलिसांवर गोळीबार केला. त्यामध्ये आरोपीचं जखमी झाला आहे. दरम्यान पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपीची पोलिसांकडून आता कसून चौकशी सुरु आहे. आरोपीने दिेलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मृतदेहाचे शीर ताब्यात घेतले आहे. दरम्यान आरोपी प्रियकराने प्रेयसीच्या हत्येची कबुली दिली आहे. मृत तरुणीचा एक मित्र होता. त्याचा भाऊ प्रिंससोबत तिची ओळख झाली होती. त्याला ती भेटायची.
हत्येच्या दिवशी तरुणी भैरवधामला जाण्यासाठी घरातून निघाली होती, आरोपी प्रिंसने तिला बाईकवरून नेऊन सोडले. घटना घडली त्यादिवशी मृत तरुणी आणि आरोपी एकत्र होते.
दोघांनी हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर संध्याकाळी घरी जात असताना आरोपीने तिची गळा दाबून हत्या केली, यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते पॉलिथिनच्या बॅगेत भरून वेगवेगळ्या जागांवर फेकून दिले.
मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon