‘कांतारा’ पाहून अंगावर आला काटा!

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

‘कांतारा‘ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटामध्ये कोणताच दिग्गज अभिनेता नसताना ‘कांतारा’ सुपरहिट ठरला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट इतिहास रचत आहे. चाहते तसेच सिनेसृष्टीतील दिग्गजांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. सुपरस्टार रजनीकांत यांनीदेखील या चित्रपटाचं आणि अभिनेता रिषभ शेट्टीचं कौतुक केलं. 

ट्विटरच्या माध्यमातून रजनीकांत यांनी चित्रपटाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रजनीकांत यांनी ट्विटरवर लिहिले की, ही अशी गोष्ट आजवर कुणीच चित्रपटाच्या माध्यमातून तेवढ्या प्रभावीपणे सांगितली नाही. कांतारा बघताना माझ्या अंगावर रोमांच उभा राहत होता. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून तुला सलाम. 
भारतीय चित्रपटसृष्टीतील या उत्कृष्ट कामाबद्दल सर्व कलाकार आणि टीमचे अभिनंदन. रजनीकांतचे हे ट्विट व्हायरल होत आहे. या चित्रपटाला केवळ सेलिब्रिटींकडूनच प्रशंसा मिळत नाही तर त्याने चांगली कमाईही केली आहे. चित्रपटाने कमाईच्या बाबतीत ‘केजीएफ’ला मागे टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच हा सिनेमा पाहणार आहेत.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon